JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Jawan teaser: झिरो ते हिरो! शाहरुखसाठी 2023 ठरणार का पावरपॅक comeback!

Jawan teaser: झिरो ते हिरो! शाहरुखसाठी 2023 ठरणार का पावरपॅक comeback!

किंग खान शाहरुखचं (Sahrukh Khan) गणित मागच्या बऱ्याच काळापासून काहीतरी बिनसलं होतं. त्याच्या कमबॅकसाठी त्याचे चाहते उत्सुक झाले होते. आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी त्याने दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 जून: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) मागचा बराच काळ बॉलिवूडपासून लांब होता.  शाहरुख खानचं नशीब त्याला मागच्या काळात म्हणावं तसं साथ देत नव्हतं असंच खरं म्हणावं लागेल. शाहरुखने घेतलेला ब्रेक कधी संपणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. किंग एसआरके (SRK new movie) ने पुन्हा कमबॅक करावं अशी चाहत्यांची मनापासून इच्छा होती. मात्र शाहरुख कडून कोणतेच संकेत मिळत नसल्याने फॅन्सची निराशा होत होती. पण आता सगळ्या शाहरुख खान फॅन्सना खूप मोठा दिलासा आणि सुखद धक्का मिळाला आहे. शाहरुख आपल्या दमदार शैलीत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 2023 हे वर्ष शाहरुखसाठी खूप खास असणार आहे. त्याच्या आणखी एका कोऱ्या करकरीत चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘जवान’ (Jawan)असं या चित्रपटाचं नाव असून एटली कुमार या नामवन्त दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलं आहे. 2 जून 2023 ला दणक्यात रिलीज होण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर (Jawan teaser) शेअर करत शाहरुखने याबद्दल माहिती दिली. अनेक दिवस या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती. एटली आणि शाहरुख यांच्या एकत्र collaboration बद्दल बरेच अपडेट समोर येत होते. या चित्रपटाचं नाव आज अखेर समोर आलं असून या ऍक्शनपॅक फिल्मसाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टीजरमध्ये शाहरूख एका डॅशिंग रूपात दिसत आहे. चेहऱ्यावर खूप जखमा झालेला शाहरुख नक्की कोणती योजना आखतो आहे हे आता कळेलच.

संबंधित बातम्या

याव्यतिरिक्त 2023 मध्ये शाहरुख खानचे आणखी 2 चित्रपट रिलीज होणार आहेत. जानेवारी महिन्यात येणाऱ्या (Pathaan) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख दमदार एंट्री करणार आहे. यामुळे 2023 ची सुरुवात धमाकेदार होणार हे निश्चित. याशिवाय राजकुमार हिरानी दिग्दर्शित (Dunki) ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख दिसणार आहे. राजकुमार हिरानी आणि एसआरके ही जोडी बघायला सगळे उत्सुक आहेत. झिरो या चित्रपटानंतर शाहरुखने मोठा ब्रेक घेतला. मोठमोठ्या कलाकारांचं ओटीटीवर आगमन झालं पण बॉलिवूडच्या किंगला कधी बघायला मिळेल हा प्रश्न फॅन्सना पडला होता. झिरो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्यावर शाहरुखने दडी मारली होती. अनेक मुलाखतीत त्याची वेगवेगळी मतं समोर आली होती. हे ही वाचाHappy Birthday Rinku Rajguru: ‘ती’ सध्या काय करते? अकलूजची आर्चीचं करिअर ‘सैराट’ मुलगा आर्यन खानला अटक झाल्यावर झालेल्या प्रकरणामुळे शाहरुखला बराच त्रास सहन करावा लागला. त्याच्या इमेजला सुद्धा बराच धक्का पोहोचला. त्यातून सावरत आता शाहरुख पुन्हा नव्या जोशात समोर येत आहे. आपल्या किंग खानला पुन्हा बघायला प्रेक्षक जितके उत्सुक आहे तितकेच त्याच्याकडून दमदार अभिनय आणि मनोरंजन व्हावं अशी अपेक्षा ठेऊन आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या