सुहाना खान
मुंबई, 12 एप्रिल : शाहरुख खान बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा नुकताच आलेला पठाण हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तसेच येणाऱ्या काळात शाहरूखच्या डंकी आणि जवान या सिनेमांचीही प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. एकीकडे चार वर्षानंतर धमाकेदार पदार्पण करत शाहरुखने आपलं स्टारडम परत मिळवलं आहे तर दुसरीकडे त्याची लेकही काही कमी नाही. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान चर्चेत आली आहे. मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकत सुहानाने एक मोठी कामगिरी केली आहे. शाहरुख खानची लाडकी सुहाना खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. सुहानाची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. आज पुन्हा एकदा किंग खानची लाडकी चर्चेत आहे. पहिल्याच बॉलीवूड पदार्पणापासूनच, सुहाना खानने ते करून दाखवले आहे जे चित्रपटांमध्ये चांगले स्थान मिळवूनही मोठ्या अभिनेत्री करू शकत नाहीत. मुंबईचा ‘तो’ भूतबंगला ज्यात राहण्यासाठी वेडे होते बॉलिवूडचे दोन सुपरस्टार्स; तिथे जे घडलं ते वाचून व्हाल थक्क चित्रपटांमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच सुहाना खान एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सौंदर्य ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. नुकतेच ‘मेबेलाइन’ या सौंदर्य उत्पादने बनवणाऱ्या कंपनीने सुहाना खानची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. या कार्यक्रमादरम्यान तिने पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला.
सुहानाचा मीडियाशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना खान लाल रंगाच्या सूट-पँटमध्ये दिसत आहे. या स्टारकिडचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडच्या नेपोटीझन वरून पुन्हा एकद सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेले नाही, पण ती अनेक ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. यावरूनच नेटकऱ्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. सुहानाची ही गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली, ‘सुहाना स्टारकिड आहे म्हणून तिला या संधी मिळतात’, ‘हा विशेषाधिकार नाही तर काय’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहे.
सुहाना खान झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातून सुहाना खानसोबत अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.