JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shahrukh Khan Video : Selfie घेण्यासाठी आलेल्या फॅनला शाहरूखची धक्काबुक्की; SRKच्या कृतीवर भडकले लोक

Shahrukh Khan Video : Selfie घेण्यासाठी आलेल्या फॅनला शाहरूखची धक्काबुक्की; SRKच्या कृतीवर भडकले लोक

सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला शाहरूखनं धुडकावून लावलं. त्याची ही कृती कॅमेरात कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

जाहिरात

shah rukh khan insult fan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मे : शाहरूख खान सध्या पठाणमुळे चर्चेत आहे. येणाऱ्या जवान सिनेमासाठी शाहरूखचे फॅन्स उत्साही आहेत.  चाहत्यांच्या प्रेमानंच मला बॉलिवूडचा बादशाहा बनवलं आहे, असं शाहरूख खान अनेकदा म्हणाला आहे. पण त्याचं हे वाक्य तोच विसरला असल्याचं समोर आलं आहे.  मुलाखतीत बोलून दाखवणं आणि सत्यात तसं वागणं याच फार मोठा फरक आहे.  माझ्या चाहत्यांमुळे मी मोठा अभिनेता झालोय असं म्हणणाऱ्या शाहरूख खाननं त्याच्या चाहत्याला दिलेली वागणूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला शाहरूखनं धुडकावून लावलं. त्याची ही कृती कॅमेरात कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेक जण वाट पाहत असतात. अशातच मुंबई एअरपोर्टवर घडलेल्या प्रकारानंतर शाहरूखवर चाहत्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे. शाहरूख खान मुंबई एअरपोर्ट आला. त्याला पाहण्यासाठी एअरपोर्ट बाहेर मोठी गर्दी झाली होतीय या गर्दीत असलेला एक चाहता शाहरूखबरोबर सेल्फी घेण्यासाठी आला. मात्र शाहरूखनं त्याचा धुडकावून लावलं. हेही वाचा - ‘मी पहिल्यांदा माधुरीला भेटले अन् ती उठून…’; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ प्रसंग

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की. शाहरूख खान एअरपोर्टमधून बाहेर येतो. बाहेर येताच त्याची वाट पाहत असलेला एक चाहता हातात फोन घेऊन सेल्फी घेण्यासाठी येतो.  पण शाहरूख सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या हाताला जोरात धक्का देतो आणि त्याला बाजूला करतो. यात त्या चाहत्याच्या हातात असलेला कोट आणि फोन देखील खाली पडताना दिसत आहे. पण शाहरूख मात्र याची काहीही काळजी नसल्याचं दिसत आहे. तो त्याच्या तोऱ्यात सिक्युरिटीमध्ये तिथून निघून जातो.

शाहरूखच्या या कृतीमुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून कमेंट्स करत लोकांनी शाहरूखला ट्रोल केलंय. एका युझरनं लिहिलंय, “याला आणखी डोक्यावर चढवा”. दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “पठाण हिट झाला पण आता जवानच्या आधीचं याचे तेवर बदललेत”. तर आणखी एका युझरनं लिहिलंय, “आमच्याचमुळे पठाण हिट झाला. नाहीतर इतके वर्ष सगळे सिनेमे फ्लॉप होत होते”. त्याचप्रमाणे “फॅन्सना थोडी इज्जत द्या”, असंही म्हणत अनेकांनी शाहरूखला ट्रोल केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या