मुंबई, 05 जुलै- बॉलिवूड आणि बिहारशी निगडीत प्रादेशिक सिनेमांमध्ये दिसणारा अभिनेता क्रांती प्रकाश झा आणि टीव्ही अभिनेता राजेश कुमार सध्या दोघँ मिळून शेती करत आहेत. दोघंही आपल्या गावी गया येथे शेती करण्यावर भर देत आहेत. कदाचित हे तुम्हाला खोटं वाटेल पण हे खरंय… अभिनयाशिवाय त्यांनी घेतलेल्या या वेगळ्या निर्णयाचं सोशल मीडियावर फार कौतुक केलं जात आहे. क्रांती आणि राजेश यांच्या मते, जेव्हापासून ते दोघं शेती करण्यासाठी गावी गेले तेव्हापासून गावकरी परिसराच्या विकासाबद्दल बोलू लागले आहेत. दोन्ही अभिनेते बिहारमधील युवकांना गाव सोडून न जाण्याची विनंतीही करत आहेत. क्रांती म्हणाला की, ‘शेती करणं हे अभिनय करण्यापेक्षा किती तरी पटीने जास्त महत्त्वाचं आहे. आपलं मुळ काय आहे हे कधीही विसरता कामा नये. पण याचा अर्थ हाही नाही की कर्मभूमीला विसरावं. मी माझ्या कर्मभूमीचाही आभारी आहे.’
टीव्ही अभिनेता राजेश म्हणाला की, या विश्वात फक्त आपण माणसंच अशी आहोत जे एकाच वेळी अनेक कामं करू शकतो. अशावेळी आपल्या शेतीकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. आमच्या या प्रयत्नांतून आम्हाला बिहारमधून बाहेरगावी गेलेल्या युवकांना परत आणायचं आहे. त्यांनी इथे येऊन जन्मभूमीचा विकास करावा अशीच आमची इच्छा आहे. सध्या आम्ही शेंगांची शेती करत आहोत. आर्थिक आणि वैज्ञानिकरित्या फायदेशीर आहे. 
एमएस धोनी सिनेमातील एक क्षण
क्रांतीच्या सिनेकरिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने फक्त भोजपुरी सिनेमांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. एमएस धोनी आणि रामलीला या सिनेमांचाही समावेश आहे.
साराभाई वर्सेस साराभाई मालिकेत रोशेस साराभाई या व्यक्तिरेखेने राजेश घराघरात पोहोचला. याशिवाय त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. राजेश टायगर श्रॉफच्या स्टूडंट ऑफ दि इअर २ सिनेमातही दिसला होता.
बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू
Bigg Boss Marahi 2- आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे- सुरेखा पुणेकर
स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge
VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर