इतकचं नाही तर स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर योगा करीत असतानाचे फोटोही तिने शेअर केले होते.
मुंबई, 29 मे : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या ‘बबली’ स्वभावासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या गोड स्वभावामुळे बॉलिवूडमध्ये अवघ्या काही वर्षातच तिने आपलं स्थान निर्माण केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तिचे भाऊ इब्राहिम अली खानबरोबरचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी तिच्याबरोबर एक मजेशीर किस्सा घडला होता, त्याचा एक व्हिडीओ मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. सारा लहानपणी तिच्या आईबरोबर शॉपिंगसाठी गेली असताना, जेव्हा ती दुकानात होती त्यावेळी सारा तिच्या भावाबरोबर दुकानाबाहेर नाचायला लागली. त्यावेळी लोकांनी तिला काही पैसे देऊ केले. (हे वाचा- ‘मेरे पेट पे लाथ मत मारो’, अक्षय कुमारला का मागावी लागली ट्विंकलची जाहीर माफी ) इन्स्टाग्रामवरील एका पेजने साराचा हा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सारा एका मुलाखतीदरम्यान घडला प्रकार सांगताना दिसत आहे.
साराचा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी देखील यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सारा तिच्या इन्स्टाग्रामवरून देखील काही मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. (हे वाचा- ‘सा रे गा मा पा’ स्पर्धक राहिलेल्या गायकाचे मोदींविरोधात अनुचित शब्द, FIR दाखल ) काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या भारत भ्रमणाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने ती भारतात जिथे जिथे फिरली आहे, तेव्हाचे काही क्षण एकत्र करून तिने हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
सारा अली खान 2021 मध्ये येणाऱ्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे.यामध्ये ती अक्षय कुमार आणि धनुष या तगड्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.