सारा अली खान
मुंबई, 26 नोव्हेंबर : सारा अली खान नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा जिम लूक नेहमीच चर्चेत असतो. सारा अनेकदा पापाराझींसाठी पोज देताना दिसते. पण पहिल्यांदाच सारा कॅमेरापासून चेहरा लपवताना दिसली. खरं तर, सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कॅमेऱ्यासमोर येताच सारा चेहरा लपवताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे. त्यासोबतच कॅमेरासमोर तिने चेहरा का लपवला याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. पण काय आहे त्यामागचं कारण पाहा. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सारा अली खानची कार जिमच्या बाहेर उभी असल्याचे पाहू शकता. साराला कॅमेरा दिसताच ती लगेच तिच्या कारमध्ये बसते. एवढेच नाही तर कारमध्ये बसल्यानंतर ती चेहरा लपवतानाही दिसत आहे. तर सारा अनेकदा पापाराझींसाठी पोज देताना दिसते. अशा परिस्थितीत साराने असे का केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चाहते या व्हिडीओवर भरपूर कमेंट करत आहेत, तसेच साराला नेमकं का चेहरा लपवावे लागला असा प्रश्न विचारत आहेत. पण तिने तिचा चेहरा का लपवला हे साराने तिच्या इन्स्टा स्टोरीतून सांगितले आहे. हेही वाचा - Shehnaaz Gill: …अन् शहनाझ गिलला चाहतीनं थेट गुडघ्यावर बसून दिली अंगठी; VIDEO व्हायरल साराने तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या मॉर्निंग लूकची एक झलक दाखवली. ती झलक दाखवत असताना ती तिचा चेहरा का लपवत होती हे सर्वांना दाखवलं. सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या गाडीत बसलेली दिसत आहे. तिचे केस मोकळे सोडून एक गाडीत बसून तिच्या चेहऱ्यावर बर्फाचा क्यूब चोळताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना साराने एक इंस्टाग्राम फिल्टरही वापरला आहे. या फिल्टरमुळे तिचा चेहरा आणखीनच गुलाबी झाला आहे आणि तिच्या डोळ्यांचा रंगही बदलला आहे. हा फोटो शेअर करत साराने लिहिले, “अर्ली मॉर्निंग फेशियल!” तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना समजलं की ती तिचा चेहरा फोटोग्राफर्सपासून का लपवत होती.
साराच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर येणाऱ्या काळात ती ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. तर यासोबतच सारा लक्ष्मण उतेकरच्या एका आगामी चित्रपटात विकी कौशल सोबत दिसणार आहे. तसंच विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबत सारा ‘गॅसलाइट’ या चित्रपटाचाही भाग असणार आहे. सारा अली खान गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. यापूर्वी तिचे ‘कुली नंबर वन’ आणि ‘अतरंगी रे’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.