JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं ब्रेकअप, समोर आलं खरं कारण

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं ब्रेकअप, समोर आलं खरं कारण

काही दिवसांपूर्वीच साराचे वडील सैफ अली खाननं कार्तिकला चांगला मुलगा असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांच्या नात्याला संमती दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवूडचं क्यूट कपल सारा अली खान आणि कार्तिक आर्यन नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आहेत.  या दोघांच्या जोडीला प्रेक्षकही खूप पसंत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच साराचे वडील सैफ अली खाननं कार्तिकला चांगला मुलगा असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांच्या नात्याला संमती दिली होती. पण आता सारा आणि कार्तिकचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत आणि यामागचं कारणही समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचं ब्रेकअप पर्सनल नाही प्रोफेशनल कारणामुळे झालं आहे. हे दोघंही कामात एवढे बीझी आहेत की, एकमेकांसाठी त्यांच्याकडे वेळच नाही. ‘लव्ह आजकल 2’चं शूटिंग संपल्यानंतर कार्तिक-सारा एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत होते मात्र कर्तिक त्याचे आगामी सिनेमा ‘पति पत्नी और वो’ नंतर लगेचच ‘दोस्ताना 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. ‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा खुलासा

सुत्रांच्या माहितीनुसार दोघंही सतत आपापल्या कामात बीझी असल्यानं एकमेकांना अजिबात वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी हे दोघंही आपापल्या प्रोफेशनल लाइफवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत. निक जोनस ‘सबसे महान पती’, प्रियांका आणि भारतीय संस्कृतीवर म्हणाला…

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. तसेच या दोघांचे कुटुंबीय सुद्धा त्यांना पसंत करतात. मात्र काही दिवसांपूर्वी फोटोग्राफर्सनी या दोघांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्यावर कार्तिकनं त्यांना असं न करण्याची विनंती केली. तसेच मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका असंही सांगितलं. त्यावरुनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. KBC 11 : 7 कोटींसाठी विचारला गांधीजी आणि फुटबॉलबद्दल प्रश्न, उत्तर माहित आहे का? =============================================================== EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या