मुंबई 12 जुलै: संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा अभिनेता त्याच्या विशेष अंदाजसाठी ओळखला जातो. संतोष सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याची धु धु धुलाई करताना दिसत आहे. त्याने एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या या दोन कलाकारांच्या हाणामारीची बरीच चर्चा होताना दिसत आहे. संतोषने शेअर केलेल्या व्हिडिओत असलेला अभिनेता म्हणजे बॉलिवूडमधील एक गुणी स्टार मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आहे. संतोष आणि मनोज यांनी एकत्र येऊन भोंसले नावाच्या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाला आज दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात संतोषने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तो असं लिहितो, “माझी आणि @bajpayee.manoj सरांच्या हाणामारीला आज २ वर्ष पूर्ण झाली, त्याचीच आठवण म्हणुन आमच्या #Bhonsle ह्या सिनेमातल्या आमच्या शेवटच्या fight च making video post करतोय.Missing “Bhonsle” shooting days. Wonderful experience ❤” या सिनेमात संतोष हा बॉलिवूड कलाकारांसोबत दिसून आला होता. एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरच्या आयुष्यावर बेतलेला हा एक अप्रतिम सिनेमा होता ज्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. संतोषच्या या सिनेमातील भूमिकेचं बरंच कौतुक सुद्धा झालं होतं. हे ही वाचा- ‘सोनाली नही फायर है तू’; केस रंगवलेले, मादक अदा पाहा सोनाली कुलकर्णीचा अनोखा अंदाज “सध्या त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. काही दिवसांपूर्वी संतोषने असाच एक विडिओ शेअर केला होता. पण त्यात तो नेमका कोणत्या अभिनेत्यासोबत मारामारी करत आहे हे स्पष्ट होत नव्हतं. त्याने बराच सस्पेंस कायम ठेवला होता. त्याच्या या अनोख्या bts व्हिडिओवर चाहत्यांनी बरंच प्रेम दर्शवलं आहे.
संतोष सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. त्याच्या कॅप्शन, त्याचे फोटो एकदम पाहण्यासारखे असतात. संतोषच्या एका नव्या सिनेमाचं शूटिंग नुकतंच संपल्याची बातमी त्याने चाहत्यांसोबत शेअर केली. तसंच येत्या काळात हा अभिनेता ‘धारावी बँक’ नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसून येणार आहे.