JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुमची मुलगी काय करते' मालिकेत अभिनेते संजय मोने यांची होणार एंट्री, मोठ्या गॅपनंतर छोट्या पडद्यावर वापसी

'तुमची मुलगी काय करते' मालिकेत अभिनेते संजय मोने यांची होणार एंट्री, मोठ्या गॅपनंतर छोट्या पडद्यावर वापसी

सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’(tumchi mulgi kay karte latest episode ) या मालिकेला सध्या रंजक वळणावर आहे. अशातच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने (sanjay mone ) यांची एंट्री होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च- सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते**’(tumchi mulgi kay karte latest episode )** या मालिकेला सध्या रंजक वळणावर आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी बेपत्ता झाली असून श्रद्धा आपल्या मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करते आहे. अशातच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने (sanjay mone ) यांची एंट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेत आणखी कोणत रंजक वळण येणारं हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. संजय मोने यांनी ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेमधून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. एका पोर्टलंन दिलेल्या माहितीनुसार, संजय मोने मालिकेत व्यंकट सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांना या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. श्रद्धाचा जीव घेण्यासाठी आलेल्या ताईच्या माणसांपासून व्यंकट सावंत श्रद्धाला वाचवताना दिसणार आहे. व्यंकट सावंत या पात्राचा उल्लेख आत्तापर्यंत श्रद्धाचे वडील म्हणून करण्यात आला आहे. व्यंकट सावंतच्या एंट्रीमुळे मालिकेत नवीन ट्वीस्ट आला आहे. आता पुढे काय होणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. वाचा- ‘तुझ्या डोळ्यात जी नशा आहे…’ प्राजक्ता माळीच्या फोटोंवर मिळाल्या भन्नाट कमेंट ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत श्रद्धा आपल्या मुलीच्या, सावनीच्या शोधासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतेय. या सगळ्या शोधात ती ताई नावाच्या एका कुख्यात स्त्रीकडे जाऊन पोहचली, पण ताईला पकडून देण्यासाठी तिने पोलिसांना मदत केली. त्यामुळे ताईच्या विरोधात गेल्याने ताई श्रद्धाच्या जिवावर उठली आहे आणि तिच्या मदतीला आता ‘व्यंकट सावंत’ ची एंट्री होणार आहे. वाचा- ‘‘मला कधीच चित्रं काढता आली नाहीत.. पण’’; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट चर्चेत पोलिसांकडून श्रद्धावर कडक नजर ठेवण्यात येते आहे. त्यातच या शोधात श्रद्धाला भेटलेली ‘ताई’ श्रद्धाच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे आता श्रद्धा आपल्या मुलीला शोधू शकेल का, सावनी खरंच गुन्हेगार असेल का, अशा प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमधून पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची एन्ट्री आता मालिकेत झालेली असल्याने मालिकेत आणखीनच रंजकता येणार आहे.

संबंधित बातम्या

आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील. शिवाय मधुरा वेलणकर, संजय मोने यांसारखी तगडी कलाकार मंडळी मालिकेत असल्याने या मालिकेची रंगत आणखीनच वाढणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या