मुंबई 23 मे: अभिनेता समीर चौगुले (Samir Chaugule) हे नाव आता महाराष्ट्रासाठी नवीन नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hayajatra) या कार्यक्रमातून घराघरात त्याचं नाव आणि टॅलेंट दोन्हीही पोहोचलं. अवघ्या महाराष्ट्राला खळखळून लावणारा समीरने अतिशय छोट्या छोट्या भूमिकांपासून करिअरची सुरवात करत आज यशाचं शिखर गाठलं आहे. समीरच्या नुकत्याच आलेल्या ऍड फिल्मचं भयानक कौतुक होतं आहे. यात तो थेट बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत (Rajkumar Rao) अभिनय करताना दिसला आहे. चिपळूणच्या या समीरने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या स्थान निर्माण केलं आहे. समीर हा मूळचा चिपळूणचा असून दहिसरमध्ये त्याचं शिक्षण झालं. लहानपणापासून समीरला अभिनयाची थोडीफार आवड होती. शाळेत त्याला अभिनयाची विशेष गोडी नव्हती किंवा तितकी आवड निर्माण झाली नव्हती. पण त्याने नकळत काही नाटकांत काम केलं. हिमगौरी आणि सात बुटके नाटकात त्याने सातव्या बुटक्याची भूमिका केली. मात्र कॉलेजमध्ये त्याने बऱ्याच नाटकात आणि एकांकिकांमध्ये कामं केली. एका प्रायव्हेट कंपनीत करत असलेला जॉब सोडून त्याने पूर्णपणे अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. त्याला हवा तसा ब्रेक संतोष पवार दिग्दर्शित यदाकदाचित नाटकातून मिळाला आणि त्याचं व्यावसायिक करिअर सुरु झालं. टिकल ते पॉलिटिकल, फु बाई फु अश्या कार्यक्रमात त्याचा सहभाग होता. आंबट गोड मालिकेत साकारलेली हृदयनाथ काकाची भूमिका खूप गाजली होती. याशिवाय एक लेखक म्हणून त्याने १७६० सासूबाई या मालिकेचे जवळपास २०० लिहिले आहेत.
VIDEO : ह्रता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात, ‘टाईमपास 3’चा फर्स्ट लुक आला समोरगेली 28 वर्षं इंडस्ट्रीत काम करत असलेला समीर पहिल्या नाटकात मात्र ब्लँक झाला होता. हा मजेदार किस्सा त्याने दिल के करीब या मुलाखतीत सांगितला आहे. “पहिल्यान्दा नाटक करताना जेव्हा पडदा उघडला तेव्हा एवढी गर्दी बघून मी सगळी वाक्य विसरलो होतो. मला बघून सगळे हसत होते आणि मला प्रचंड टेन्शन आलं होतं. मी तसाच स्टेजवर उभा होतो आणि सरानी वाक्य सांगितल्यावर मी पुढचं वाक्य बोललो.”
समीरने महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये अनेक स्किट्स लिहिली आहेत. त्याच्या शिवली हे खरंय…, तारपा नृत्य, डोअरबेलसोबतच अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. मागे कधीतरी समीरच्या निधनाची बातमी पसरली होती. घरात शूट करत असल्याने त्याला कसलीच माहिती नसताना फेसबुकवर कोणीतरी पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यावरदेखील त्याने एक स्किट सादर करून सगळ्यांना हैराण केलं होतं. आज समीर राजकुमार रावसोबत एका जाहिरातीत दिसला आहे. बॉलिवूड कलाकारांसोबत काम करण्याची संधी बऱ्याच कलाकारांना मिळते मात्र महाराष्ट्राच्या लाडक्या सम्याला बॉलिवूड कलाकारसोबत बघून सगळ्यांना आनंद होतो. मागे महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमला शेहेनशाह अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली होती.