JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Samantha Ruth Prabhu: 'अनेक अपयशी लग्नांचं कारण फक्त तूच!' 'पुष्पा' फेम अभिनेत्रीचा करण जोहरवर थेट आरोप!

Samantha Ruth Prabhu: 'अनेक अपयशी लग्नांचं कारण फक्त तूच!' 'पुष्पा' फेम अभिनेत्रीचा करण जोहरवर थेट आरोप!

पुष्पा सिनेमातील आयटम सॉंगने प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) बहुचर्चित कॉफी विथ करण शोमध्ये दिसणार आहे. यात ती आपल्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींबद्दल बोलताना दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 जुलै: साऊथ अभिनेत्री समंथा रूथ (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चेत येत आहे. समंथा ही एक गुणी अभिनेत्री आहेच पण पुष्पा चित्रपटातील गाण्याने तिला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. येत्या काळात समंथा कॉफी विथ करणच्या (Koffee With Karan) नव्या सिजनचा भाग असणार आहे. या सिजनमध्ये तिने तिच्या घटस्फोटावर भाष्य करत काही गोष्टींचा खुलासा केल्याचं समोर येत आहे. पुष्पा (Pushpa movie item song) चित्रपटातील सुपरहिट आयटम सॉंगमुळे सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू चर्चेत आली. सध्या आणखी बऱ्याच वेगवेगळ्या कारणांनी बरीच चर्चेत येताना दिसत आहे. समंथा आणि तिचा ex-husband नागा चैतन्य यांच्यातील घटस्फोटाचा किस्सा सुद्धा बराच रंगला होता. तिच्या घटस्फोटाबद्दल तिने आजपर्यंत कधीच उघडपणे खुलासा केला नव्हता. सध्या तिचे बॉलिवूडकरांशी सुद्धा चांगले संबंध जुळू लागले आहेत. अशातच तिची KWK शो मध्ये येण्याची बातमी समोर येत होती. आलेल्या नव्या टीजरमध्ये समंथा करण जोहरच्या चांगलीच हजेरी घेताना दिसत आहे. “अनेक अपयशी आणि दुःखी लग्नाचं कारण तू आहेस करण. तू सगळ्या सिनेमांमधून दाखवलं की आयुष्य हे K3G सारखं आहे पण प्रत्यक्षात आयुष्य KGF सारखं आहे.” असं हसतहसत समंथा बोलताना दिसते. उघड उघडपणे तिने लग्न मोडण्याबद्दल काही सांगितलं नसलं तरी लग्नांमध्ये असणारी रिऍलिटी या वक्तव्यातून समोर येत आहे. यावरून काहींनी तिच्या लग्नातील नाराजीचा अंदाज बांधला आहे. आता समंथा आपलं लग्न सफल न झाल्याबद्दल काय म्हणते हे एपिसोडमध्ये जाणून घेणं महत्त्वाचं असेल.

संबंधित बातम्या

तूर्तास तरी तिचं हे वक्त्यव्य तिला पुन्हा एकदा हेडलाईन्स मध्ये घेऊन आलं आहे. करणचा हा टॉक शो गॉसिप, पर्सनल लाईफ, सेक्स लाईफ याबद्दल बरीच चर्चा करणारा आहे. कलाकारांच्या आयुष्याचा एक वेगळाच अंदाज यात पाहायला मिळतो. काहींच्या मते हा शो एक व्ह्यू मिळवायचं साधन आहे तर काहीजण या शो ची आतुरतेने वाट बघत असतात. हे ही वाचा-  Samantha Ruth Prabhu: Ex-husband च्या डेटिंग लाईफबद्दल भडकली समंथा, म्हणाली…

 समंथाच्या पर्सनल फ्रंटवर सांगायचं तर समंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या मरेज ऍनिव्हर्सरी नंतर थोड्याच काळात वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका भावुक पोस्टमधून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना ही बातमी सांगितली ज्यावर अनेक चाहत्यांना दुःख झालं. समंथा आणि नागा चैतन्य ही जोडी चाहत्यांच्या आवडीची होती. समंथा रूथ आणि तिचं पर्सनल आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या