मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samantha Ruth Prabhu: Ex-husband च्या डेटिंग लाईफबद्दल भडकली समंथा, म्हणाली...

Samantha Ruth Prabhu: Ex-husband च्या डेटिंग लाईफबद्दल भडकली समंथा, म्हणाली...

समंथा रूथ आणि तिचं पर्सनल आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. समंथाने आज एका ट्विटमधून तिचा राग व्यक्त केला आहे.

समंथा रूथ आणि तिचं पर्सनल आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. समंथाने आज एका ट्विटमधून तिचा राग व्यक्त केला आहे.

समंथा रूथ आणि तिचं पर्सनल आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. समंथाने आज एका ट्विटमधून तिचा राग व्यक्त केला आहे.

    मुंबई 21 जून: पुष्पा (Pushpa movie) चित्रपटातील सुपरहिट आयटम सॉंगमुळे चर्चेत आलेली सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या आणखी बऱ्याच वेगवेगळ्या कारणांनी बरीच चर्चेत येताना दिसत आहे. समंथा आणि तिचा ex-husband नागा चैतन्य यांच्यातील (Samantha Ruth and Naga Chaitanya divorce) घटस्फोटाचा किस्सा सुद्धा बराच रंगला होता. पण समंथाच्या आजच्या त्ववेतची बरीच चर्भच होताना दिसत आहे. समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्याच्या (Naga Chaitanya) आयुष्यात एका वेगळ्या मुलीच्या येण्याचे संकेत आले आहेत अशी बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी आली होती. पण आज समंथाने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून जबरदस्त ट्विट करत याबाबतीत आपलं मत मांडलं आहे. एका न्यूज रिपोर्टच्या सांगण्यानुसार नागा चैतन्यच्या आयुष्यातील एका मुलीच्या प्रकरणाचं प्लॅनिंग समंथाच्या PR टीम कडून करण्यात आलं होतं आणि हा नागा चैतन्यला बदनाम करायचा एक डाव आहे. या रिपोर्टवर समंथा चांगलीच भडकली आणि तिने ट्विट करत असं सांगितलं “जर मुलीबद्दल अफवा असतील तर खरं आणि जर मुलाबद्दल अफवा असतील तर मुलीने आखलेला डाव? दोनही व्यक्ती आपापल्या आयुष्यात पुढे गेल्या आहेत. तुम्हीही जा. प्लिज ग्रो अप’ अशा कणखर शब्दात तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. मागच्या काही दिवसात नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता  धुलिपाला यांच्या डेटिंगबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसत होती. मात्र हे सगळं समंथाच्या पीआर टीमकडून मुद्दाम करण्यात आल्याचं एका न्यूज पोर्टलने आपल्या लेखात म्हणलं होतं. आणि नागा चैतन्यच्या चाहत्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाहीये असं सुद्धा त्यात म्हणलं होत. समंथाने या न्यूज रिपोर्टवर आपलं मत व्यक्त करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे असच म्हणावं लागेल. समंथा जी आपली मत परखडपणे सांगण्यासाठी ओळखली जाते तिने यावेळी सुद्धा तिच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल स्पष्टपणे मत मांडलं आहे ज्याबद्दल तिच्या चाहत्यांकडून तिचं खूप कौतुक होताना दिसत आहे. हे ही वाचा- Nayanthara: साऊथ सुंदरी नयनताराने हनीमूनसाठी निवडलं 'हे' ठिकाण; फोटोंची सोशल मीडियावर चर्चा तिच्या पर्सनल फ्रंटवर सांगायचं तर समंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या मरेज ऍनिव्हर्सरी नंतर थोड्याच काळात वेगळं होण्याचच निर्णय घेतला. एका भावुक पोस्टमधून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना ही बातमी सांगितली ज्यावर अनेक चाहत्यांना दुःख झालं. समंथा आणि नागा चैतन्य ही जोडी चाहत्यांच्या आवडीची होती.
    First published:

    Tags: South actress, South indian actor

    पुढील बातम्या