JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राहुल गांधींना 'लोकशाहीचा राजा' म्हणणारेच मोदींच्या विजयास कारणीभूत, जावेद अख्तरांनी सलमान खुर्शीदांना सुनावलं

राहुल गांधींना 'लोकशाहीचा राजा' म्हणणारेच मोदींच्या विजयास कारणीभूत, जावेद अख्तरांनी सलमान खुर्शीदांना सुनावलं

सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच एक ट्विट केलं असून त्यांनी राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला आहे. त्यांचं हे विधान अनेकांना पटलेलं नसून यात प्रसिद्ध लेखर जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचाही समावेश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच एक ट्विट केलं असून त्यांनी राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला आहे. खुर्शीद यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राजीव गांधी यांचा कोलाज फोटो शेअर करत हे ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं, की ‘भारतीय लोकशाहीचे माजी आणि भविष्यातील राजे’. त्यांचं हे विधान अनेकांना पटलेलं नसून यात प्रसिद्ध लेखर जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचाही समावेश आहे. याबाबत एक ट्विट करत अख्तर म्हणाले, की ‘लोकशाहीचा राजा’ म्हणणं हा एक विरोधाभास आहे. राहुल गांधी एक चांगला विरोधीपक्ष नेता होऊ शकतात. मात्र, पंतप्रधान नाही, असं अख्तर म्हणाले. अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की मिस्टर सलमान खुर्शीद, तुमचा विरोधाभास, ‘लोकशाहीचा राजा’ उल्लेख अत्यंत निराशाजनक आहे. राहुल गांधी एक उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून मान्य आहेत. मात्र, जो कोणी त्यांना पंतप्रधान बनवण्याची स्वप्न पाहातो, तो नरेंद्र मोदींना कायमचे पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या

जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे, तर अनेकांनी त्यांच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे. निखिल जाधन नावाच्या एका युजरनं म्हटलं, की हे अत्यंत चुकीचं आहे. राहुल गांधींमध्ये पंतप्रधान बनण्याची पात्रता आहे. तुम्ही केवळ डोळे बंद करुन त्यांच्याविरोधात मोहिम चालवत आहात. भाजपनं आयटी सेल आणि ट्रोल करुन त्यांची इमेज खराब केली आहे. मोदी देशातील जनतेला एक किंवा दोनदा धोका देऊ शकतात, वारंवार नाही रत्ना बाजपेयी नावाच्या एका यूजरनं अख्तर यांना विचारलं आहे, की राहुल गांधींबाबत तुम्ही असा विचार करता हे ठीक आहे. मग आता पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून तुम्ही कोणाकडे पाहात, हेदेखील सांगा. म्हणजे तुमच्या ट्विटमध्ये अधिक स्पष्टता येईल. सोनाली पंडीत नावाच्या एका युजरनं लिहिलं, की मोदी पुढे पंतप्रधान राहातील की नाही हे माहिती नाही. मात्र, या लोकांचा राहुल यांची इमेज खराब करण्यात काहीही कमी सोडलेली नाही. तसंही काँग्रेसकडे पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या