सलमान खान
मुंबई, 07 एप्रिल: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याचे चित्रपट नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याला सध्या वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अलीकडेच सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली आहे. सतत मिळणाऱ्या या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने आता मोठे पाऊल उचलले आहे. सततच्या धमक्यांमुळेअभिनेता सलमान खानने नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. या महागड्या आणि आलिशान गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अलीकडे त्याच्या सुरक्षेसाठी खूप चर्चेत आहे. सततच्या धमक्यांमुळे ‘किसी का भाई किसी की जान’ अभिनेता सलमान खानने नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे हे वाहन भारतीय बाजारपेठेतही लाँच झालेले नाही. आपल्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला धमकीची पत्रे येत होती, त्यानंतर भाईजानने हा मोठा निर्णय घेतला आहे. Aai Kuthe Kay Karte: आईनंतर लेक चढणार बोहल्यावर! ईशा आणि अनिषविषयी अरुंधती घेणार मोठा निर्णय अभिनेत्याने आपली नवीन कार परदेशातून आयात केली आहे. निसान पेट्रोल एसयूव्ही असे या वाहनाचे नाव आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे वाहन सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. पण सुरक्षेच्या दृष्टाने दबंग खानने ही गाडी विदेशातून मागवली आहे. दक्षिण आशियात या गाडीची चांगलीच क्रेझ आहे. ही बुलेटप्रूफ गाडी असल्याने या कारची किंमत खूपच जास्त आहे. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही हे वाहन अतिशय खास मानले जाते.
सलमान खानने खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार ही पांढऱ्या रंगाची असून खूपच स्टायलिश आहे. एका जपानी कंपनीने या गाडीची निर्मिती केलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या गाडीला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. सलमानने बुलेटप्रूफ कार खरेदी केल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या भाईजानला शुभेच्छा देत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात सलमानने या नव्या बुलेटप्रूफ गाडीतून हजेरी लावली होती.
सलमानच्या नव्या कारचे वैशिष्ट्य? सलमान खानने खरेदी केलेल्या निसान पेट्रोलमध्ये ५.६-लिटर व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे इंजिन ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची बाजारातील किंमत ८० लाख आहे.पण सलमान खानने आयात केलेली कार बुलेटप्रूफ आणि चिलखती आहे, त्यामुळे तिची किंमत करोडोंमध्ये आहे.