JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुख खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री! सलमान खाननं दिलं संकेत

शाहरुख खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री! सलमान खाननं दिलं संकेत

नुकताच शाहरुख खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हाच व्हीडिओ बॉलिवूड भाईजान सलमान खानने रिशेअर करत सर्वांनाच खात्रीशीर संकेत दिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर- काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा (Shahrukh Khan) एक व्हडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये शाहरुखला फोमो झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यांनतर शाहरुख खानचा पुन्हा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सलमाननेही**(Salman Khan)** तो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिल आहे. त्यामुळे शाहरुख खान लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संबंधित बातम्या

नुकताच शाहरुख खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हाच व्हीडिओ बॉलिवूड भाईजान सलमान खानने रिशेअर करत सर्वांनाच खात्रीशीर संकेत दिले आहेत. सांगायचं झालं तर हा व्हिडीओ हॉटस्टार डिस्नेची एक जाहिरात आहे. मात्र यामध्ये असं दाखविण्यात आलं आहे. यामध्ये शाहरुख खान आपल्या बाल्कनीत उभा असतो. यावेळी तो आपल्या चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करत असतो. दरम्यान अभिनेता विजय त्याच्या शेजारी उभे असतात. त्यांना एक फोन आलेला असतो. (हे वाचा: नुसरत जहाँच्या मुलाच्या जन्मदाखल्याने उघडलं वडिलाचं नाव; पहिल्यांदाच झाला खुलासा ) त्यांनतर शाहरुख त्यांना विचारतो माझा क्राईम थ्रिलर स्टोरी त्यांना पसंत पडली का? यावर विजय उत्तर देतात नाही, कारण ते तर अजय करत आहे. त्यावर शाहरुख विचारतो हॉरर कॉमेडी विजय म्हणतात नाही ते सैफ करत आहे. मग शाहरुख म्हणतो ऍक्शन यावर विजय सांगतात आयपीएल आहे ना त्यासाठी. शाहरुख म्हणतो कॉलेज लव्हस्टोरी तर कोणाकडे नसेल यावर विजय उत्तर देतात सर ९० चा दशक तर संपला ना. यावर शाहरुख विचारतो मग मी काय करू? असा हा मजेशीर डिस्ने हॉटस्टारचा व्हिडीओ आहे. (हे वाचा: Nusrat Jahanची YashdasGupta सोबत पार्टी; ‘आई’ झाल्याचा आनंद केला साजरा ) हा व्हिडीओ शाहरुखने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर हि पोस्ट रिपोस्ट करत सलमानने कॅप्शन दिलं आहे, ‘स्वागत नाही करणार शाहरुखचं? आणि समोर प्रश्न चिन्ह दिला आहे. सलमान आणि शाहरुखच्या या पोस्टवरून शाहरुख खान लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते फारच उत्सुक झाले आहेत. शिवाय सलमान खानने पोस्ट केल्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या