मुंबई 8 जुलै**:** अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याची बहिण अलवीरा खान (Alvira Khan) यांच्या विरोधात चंदिगढमधील एका व्यवसायिकानं आर्थिक फसवणूकीची तक्रार केली आहे. (financial fraud case) दरम्यान या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत चंदिगढ पोलिसांनी सलमानसह त्यांच्या बिंग ह्युमन (Being Human) कंपनीतील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ‘माझ्यासारखं काम करा, मग मानेन’; किर्तीनं दिलं बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान मिळालेल्या माहितीनुसार या व्यवसायिकाचं नाव अरुण गुप्ता असं आहे. त्यानं बिंग ह्युमनची एक ब्रांच चंदिगढमध्ये सुरु केली होती. या व्यवहारात त्याच्याकडून 3 कोटी रुपये घेतले गेले. परंतु काही महिने उलटून गेले तरी त्याला सामान काही मिळालं नाही. या प्रकरणी त्यानं कंपनीकडे तक्रार केली. परंतु त्यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अखेर त्याने सलमान, त्याची बहिण अर्पिता आणि बिंग ह्युमन कंपनीविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून व्यवसायिकानं कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे. 23 हजार हिरे, 887 ग्रॅम सोनं; पाहा जगप्रसिद्ध गायकाचं कोट्यवधींचं लॉकेट अरुण गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलमानसोबत काही फोटो देखील काढले होते. ते सलमानचे खूप मोठे फॅन आहेत. अन् सलमानवर विश्वास ठेवूनच त्यांनी गुंतवणूक केली होती. परंतु त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला. शोरुमच्या ओपनिंगसाठी स्वत: सलमाननं येण्याचं वचन त्यांना दिलं होतं परंतु शेवटी त्यांनी आपला मेहुणा आयुष शर्माला पाठवलं असा दावा त्यांनी केला आहे. या व्यवहारात त्यांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.