JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘यापुढे सलमानशी पंगा नकोच’; मानहानीचा दावा ठोकताच अभिनेत्यानं घेतली माघार

‘यापुढे सलमानशी पंगा नकोच’; मानहानीचा दावा ठोकताच अभिनेत्यानं घेतली माघार

‘यापुढे कुठलाच रिव्ह्यू करणार नाही’; सलमानशी पंगा घेणं अभिनेत्याला पडलं भारी

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 मे : अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai)  ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना भेटीला आला होता. त्यानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर नेहमीच विविध चित्रपटांवर आपली समिक्षा देणारा अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरके (KRK) ने देखिल रिव्हू दिला होता. मात्र केआरकेने चित्रपटाची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आणि त्यानुसारच सलमानच्या वकिलांनी त्याला नोटीस पाठवली आहे. सलमानच्या या कारवाईनंतर केआरके ने ट्वीट करत माहीती दिली आहे. व त्यानंतर त्याने आणखी काही ट्वीट्स केली आहेत. पहिल्या ट्वीट मध्ये त्याने म्हटलं आहे, ‘प्रिय सलमान खान हा मानहानीचा दावा तुझ्या निराशेचं कारण आहे. मी माझ्या फॉलोवर्ससाठी रिव्हू देत आहे आणि माढं काम करत आहे. तुम्ही चांगले चित्रपट बनवायाला हवेत ना की मला रिव्हू देण्यापासून रोखलं पाहिजे. मी सत्यासाठी लढतो. या केस साठी धन्यवाद.’

यानंतर केआरकेने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे. ‘मी त्या चित्रपटांचे रिव्हू करत नाही ज्यांच्या निर्मात्यांनी किंवा कलाकारांनी मला रिव्हू देण्यास नकार दिला आहे. सलमान खान ने माझ्यावर राधेच्या रिव्हूनंतर मानहानीची केस केली आहे. यामुळे हे स्पष्ट आहे की ते माझ्या रिव्हूने नाराज आहेत. मी इथून पुढे त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचा रिव्हू करणार नाही.’

संबंधित बातम्या

केआरके ने राधेच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचा रिव्हू दिला होता. ज्यात त्याने चित्रपटाला अतिशय खराब म्हटलं होतं. तर आपण अर्ध्यापेक्षा जास्तवेळ चित्रपट पाहू शकले नाही असही म्हटलं होत. तो व्हिडीओ फार व्हायरल देखिल झाला होता. त्यानंतर केआरकेवर ही केस करण्यात आली.

पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? पाहा दिलीप जोशींचा प्रेरणादायी प्रवास

दरम्यान सलमान खान किंवा त्यांच्या टिम मधील कोणीही अद्याप या गोष्टीवर कोणतच भाष्य केलेलं नाही. तर केआरके ने त्याच्या ट्वीट सोबत नोटीस पेपरचाही फोटो पोस्ट केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या