JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘सोनू सूद किंवा सलमान खानला देशाचे पंतप्रधान करा’; अभिनेत्री नरेंद्र मोदींवर संतापली

‘सोनू सूद किंवा सलमान खानला देशाचे पंतप्रधान करा’; अभिनेत्री नरेंद्र मोदींवर संतापली

“काम करणं जमत नसेल त निवृत्ती घ्या, आम्हाला तुमची टीव्हीवरील भाषणं नको आहेत. मदत हवी आहे.”; अभिनेत्रीचा नरेंद्र मोदींवरील विश्वास उडाला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 मे**: “**सोनू सूद किंवा सलमान खान यांना कृपया देशाचे पंतप्रधान करा. कारण खरे हिरो तर तेच आहेत. बाकीचे सर्व भाषणं ठोकण्यात व्यस्त आहेत.” असा जोरदार टोला अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिनं केंद्र सरकारवर लगावला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं सध्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालिचा वाढला आहे. रुग्णालयात औषधं, बेड, लसी यांची कमतरता जावणत आहे. मात्र याही परिस्थितीत आपले नेते लोकांची मदत करण्याऐवजी भाषणं ठोकत फिरतायेत असा आरोप राखी सावतं हिनं केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं देशातील सद्य परिस्थितीवर संताप व्यक्त केला. राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यावेळसही तिनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जर देश चालवता येत नसेल निवृत्ती स्विकारा. लोकांना आज मदतीची गरज आहे तुमच्या भाषणांची नाही. दिवसभर वाद-विवाद करत असता, उठसूठ भाषणं ठोकता आम्हाला आता वैगात आलाय तुमच्या या बोलबच्चनगीरीचा. आम्हाला खरीखुरी मदत हवी आहे. रुग्णालयात बेड हवे आहेत. औषधं, लसी आणि ऑक्सिजन हवं आहे. जर ते देता येत नसेल तर नेतेगीरी करणं बंद करा. तुमच्यापेक्षा अधिक काम सलमान खान (Salman Khan) आणि सोनू सूद (Sonu Sood) करताना दिसतायेत. खरे हिरो तर तेच आहेत. त्यांनाच या देशाचं पंतप्रधान करा.” ‘Raazi’ चित्रपटात काम कसं मिळालं? अमृता खानविलकरनं सांगितला त्या पाकिस्तानी भूमिकेचा किस्सा

संबंधित बातम्या

राखी सावंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आजवर अनेकदा राखीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. मोदींमुळंच ती भाजपाला पाठिंबा देते असं ती यापूर्वी म्हणाली होती. परंतु यावेळी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन तिचा मोदींवरचाही विश्वास उठला असं ती म्हणाली. तिच्या या व्हिडीओवर काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या