मुंबई, 14 ऑक्टोबर- काही सिनेमे हे आयुष्यभर लक्षात राहतात. काळानुसार त्यांचा विसर न पडता नेहमीच हृदयाच्या कोपऱ्यात एका सिनेमाचं स्थान कायम असतं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा. हा सिनेमा येऊन दोन- तीन वर्ष उलटली तरी सिनेमातील अनेक संवाद आणि गाणी लोकांच्या आजही तोंडावर आहेत. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे कळून घ्यायचं असेल तर ते आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूला विचारा. तिच्या नावाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. सैराट सिनेमा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गाजला होता. या सिनेमाची क्रेझ एवढी होती की बॉलिवूडकरही स्वतःला यापासून दूर ठेवू शकले नाही. करण जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शनमधून या सिनेमाचा हिंदीत रिमेक करण्याचा निर्णय घेतला. यावरूनच सैराट सिनेमाची क्रेझ किती असेल याचा अंदाज येतो.
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी या सिनेमातून दोघांनाही ओळख मिळाली. पण नुकताच रिंकूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात दोघी एकमेकांना गळाभेट देताना दिसत आहेत. यात रिंकूने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यावर काळ्या आणि पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली असून काळ्या रंगाची टिकली लावली आहे. तर जान्हवीने निळ्या रंगाची जीन्स घातली असून मल्टी कलरचं टी- शर्ट घातलं आहे. दोघींचा मेकअपशिवायचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रिंकूने या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं की, ‘जेव्हा सैराट धकडला भेटतं.’ सिनेमांबद्दल बोलायचे तर रिंकू राजगुरूने नुकतंच कागर सिनेमात काम केलं होतं. यानंतर ती गणेश पंडीत दिग्दर्शित मेकअप या सिनेमात दिसणार आहे. तर जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती एका पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी 13 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS