मुंबई, 14 फेब्रुवारी : बॉलिवूडमधील सर्वाधिक कपल सैफ अली खान आणि करिना कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. या कपल बद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. पण नुकतीच एका चॅट शोमध्ये करिना आणि सैफची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. एरवी कोणत्याही शोमध्ये फारसा न बोलणाऱ्या सैफनं या शोमध्ये चक्क त्यांची बेडरुम सिक्रेट शेअर केलं. करिना कपूरचा चॅट शो व्हॉट विमेन वॉन्टच्या व्हॅलेंटाइन स्पेशल एपिसोडमध्ये सैफ अली खाननं हजेरी लावली होती. यावेळी करिनानं त्याला त्याच्या पर्सनल लाइफ विषयी काही प्रश्न विचारले. ज्याचा सैफनं दिल खुलास उत्तरं दिली आणि यासोबतच त्यानं करिनासोबत त्याच्या असलेल्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दलही अनेक खुलासे केले. दरम्यान तो या मुलाखतीत असं काही बोलला की करिना कपूर त्याचं बोलणं ऐकून लाजेनं गोरीमोरी झाली. सिद्धार्थ शुक्लानं घेतला अर्जुन कपूरशी पंगा, सोशल मीडियावर भांडणाचा VIDEO VIRAL
या शोमध्ये करिनानं सैफला मॅरिड लाइफ बद्दल काही प्रश्न विचारले. करिनानं त्याला विचारलं, सैफ अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या वैवाहिक जीवनात करायला हवी. असं काही जी तुमच्या वैवाहिक जीवनातला उत्साह कायम ठेवण्यास मदत करेल. करिनाच्या या प्रश्नावर सैफनं लगेच उत्तर दिलं. ‘रोल प्ले’ सैफचं हे उत्तर ऐकताच करिना चक्क लाजलेली दिसली. टायगर नाही तर मग दिशा पाटनी कोणासोबत साजरा करतेय Valentine’s Day, पाहा PHOTO
करिना म्हणाली, खरं तर मी माझ्या शोमध्ये जवळपास सर्वच संभव्य मुद्द्यांवर बोलले आहे त्यामुळे हे ठिक आहे. त्यानंतर सैफ म्हणाला मी फक्त गंमत करत होतो. सैफ पुढे म्हणाला, तुम्ही तुमच्या जीवनात नेहमीच काही वेगळं करत राहिलो तर जीवनातला उत्साह सुद्धा कायम राहतो. कारण जेव्हा तुम्ही तुमचं काम संपवून दिवसाच्या शेवटी एकमेकांना भेटू तेव्हा आपल्याकडे काही वेगळं असेल. आयुष्यात सतत एकच गोष्ट केल्यानं ते कंटाळवाणं वाटू लागतं. तसंच मला वाटतं की, जीवनात स्पार्क राहावा असं वाटत असेल तर कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक ताण घेऊ नये. Bigg Boss 13 ची बक्षिसाची रक्कम वाढवली? विजेत्याला मिळणार इतके कोटी