JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kareena-Saif Wedding Pic: वडिलांच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होती सारा;सावत्र आई करीनासोबतचा फोटो VIRAL

Kareena-Saif Wedding Pic: वडिलांच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होती सारा;सावत्र आई करीनासोबतचा फोटो VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान आज आपल्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

जाहिरात

सारा अली खान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑक्टोबर-   बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. परंतु स्टारकिड्स असूनसुद्धा सारा अली खानने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ती तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतंच सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. सोशल मीडियावर सारा आणि शुभमनचा एक व्हिडिओ आणि एक फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान आता साराचे वडील अभिनेता सैफ अली खान आपल्या दुसऱ्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा करत आहे. तत्पूर्वी या लग्नातील सारा आणि इब्राहिमचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. सारा अली खान ही एक बिनधास्त अभिनेत्री आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या या लाडक्या लेकीचा जन्म 1993 मध्ये झाला होता. साराचा जन्म झाला तेव्हा तिची आई 35 वर्षांची होती आणि वडील सैफ 23 वर्षांचे होते. सैफ आणि अमृता लग्नाच्या काही वर्षानंतर 2004 मध्ये विभक्त झाले होते. त्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं आहे. विशेष म्हणजे, 1991 मध्ये जेव्हा सैफ आणि अमृताचं लग्न झालं होतं, तेव्हा 11 वर्षांची करीना देखील या लग्नाला उपस्थित होती आणि तिने सैफ आणि अमृताला शुभेच्छादेखील दिल्या होत्या. **(हे वाचा:** VIDEO: करण जोहरच्या मुलांनीही उडवली त्याची खिल्ली, नक्की काय झालं यश आणि रुहीला? ) दुसरीकडे, सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं 2012 साली लग्न झालं तेव्हा पतौडी कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच सैफ आणि अमृताची लेक सारा अली खाननेही या लग्नात उपस्थिती लावली होती. सैफ-करीनाच्या लग्नात सारा 17 वर्षांची होती. यावेळी सारा तिच्या मैत्रिणींसोबत जवळपास आठवडाभर चाललेल्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी झाली होती. यावेळी साराचा भाऊ इब्राहिमदेखील उपस्थित होता. सारा अली खानची आत्ती आणि सैफ अली खानची बहीण सबा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफ आणि करीनाच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. याच फोटोमध्ये सारा आणि इब्राहिमसुद्धा उपस्थित असलेले दिसून येत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंवर विवीध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सारा अली खान ही एक अत्यंत समजूतदार मुलगी आहे. सारा तिची आई अमृता सिंगवर प्रचंड प्रेम करते आणि तिला कामातून वेळ मिळताच अमृतासोबत सुट्टीवर जाते. या दोघी मायलेकींमध्ये फार छान बॉन्डिंग आहे. साराचं वडील सैफ अली खानसोबतसुद्धा उत्तम जमतं. इतकंच नव्हे तर साराचं करिनासोबतसुद्धा चांगलं बॉन्डिंग आहे. आता सैफ आणि करिनाच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या