JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Riya Chakraborty: रिया चक्रवर्तीमुळे सुशांत झाला 'ड्रग अ‍ॅडिक्ट'; चार्जशीटमध्ये NCBचा गंभीर आरोप

Riya Chakraborty: रिया चक्रवर्तीमुळे सुशांत झाला 'ड्रग अ‍ॅडिक्ट'; चार्जशीटमध्ये NCBचा गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूर प्रकरणात रिया चक्रवर्तीवर करण्यात आलेले आरोप काही संपण्याचं नाव घेत नाहीये. रिया पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै: अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आकस्मिक मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. अजूनही सुशांतच्या मृत्यूचा तपास पूर्ण झालेला नाही. आता पुन्हा एकदा या प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. NCBने सुशांतच्या मृत्युप्रकरणी आरोपपत्राचा मसुदा सादर केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह 35 जणांच्या नावांचा समावेश आहे. अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यांच्यासह 35 जणांवर बॉलिवूड आणि उच्चभ्रू समाजात ड्रग्ज वितरण करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा  आरोप ठेवण्यात आला आहे. या सगळ्यांनी मिळून सुशांतला ड्रग्जच्या आहारी नेलं आणि त्याला ड्रग्ज पुरवले असंही या आरोपपत्राच्या मसुद्यात म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे. (Rhea Chakraborty Update in Sushant Singh Rajput Case) सुशांत 2018 पासून ड्रग्ज घेत होता, असं या ड्राफ्टमध्ये म्हटलं आहे. 2020 मध्ये सुशांतला या आरोपींकडून ड्रग्ज पुरविण्यात आले होते. त्याला पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी नेण्यात आणि त्यासाठी त्याला ड्रग्ज पुरविण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा ठपका यात आहे. NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances A ct) कायद्याअंतर्गत विविध कलमं या आरोपींवर लावण्यात आली आहेत. यामध्ये रिया, तिचा भाऊ शौविक आणि त्याच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी यांच्यावर सुशांतसाठी ड्रग्ज आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2018 पासून सुशांतला त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विविध व्यक्तींकडून ड्रग्जचा पुरवठा होत होता असं या ड्राफ्टमध्ये NCBनs म्हटलं आहे. 2020 मध्ये सुशांत किंवा रिया चक्रवर्तीच्या मागणीवरून ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, असा दावा NCB ने केला आहे. रियानं काही वेळा गांजा खरेदी करून तो सुशांतपर्यंत पोहोचवल्याचं NCB चं म्हणणं आहे. सिद्धार्थ ‘पूजा सामग्री’च्या नावाखाली सुशांतच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून ड्रग्ज खरेदी करत होता, असाही NCB चा दावा आहे. हेही वाचा - IND Vs ENG: करीनाने पहिल्यांदाच तैमुरला नेलं स्टेडिअमवर; पाहा त्याची रिअ‍ॅक्शन अभिनेता अर्जुन रामपालच्या भावाचा पार्टनर अ‍ॅगिसिलाओस दिमित्रियादेस, यानं एका नायजेरियन व्यक्तीकडून कोकेन, कॅनाबिस आणि गांजा खरेदी करून या दोन आरोपींना आणि बॉलिवूडमधल्या ‘हाय प्रोफाइल’ व्यक्तींना अनेकदा पुरवलं होतं, असाही दावा NCB ने केला आहे. अर्थात या हायप्रोफाइल व्यक्ती कोण याबद्दल NCB च्या या ड्राफ्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. पैशांसाठी हा आरोपी ड्रग्ज पुरविण्याचं काम करायचा असं यात म्हटलं आहे.. NCB ने आरोपींवर NDPS कायद्याच्या कलम 8 (C)सह 20 (b) (ii), (A), 22,27, 27A,28,29 आणि 30 अंतर्गत आरोप ठेवले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचं उत्पादन, निर्मिती, विक्री, खरेदी, वाहतूक आणि पुरवठा या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. तसंच कॅनाबिस किंवा मारिजुआनासारख्या अमली पदार्थाचा वापर, psychotropic substances, अवैधरित्या आर्थिक वाहतूक, गुन्हेगारांना आश्रय देणं किंवा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि गुन्हेगारी कट रचणं यांचा यात समावेश आहे. हेही वाचा - हेलिकॉप्टरमध्ये अचानक Bear Gryll ला किस करु लागला रणवीर सिंह; त्यांनतर जे घडलं,पाहा VIDEO आता आरोप सिद्ध करण्यापूर्वी कोर्ट त्यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा अभ्यास करेल आणि NCB आणि आरोपींची बाजूही ऐकून घेईल; मात्र बॉलिवूडमध्ये किती मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सहजपणे पुरवले जातात याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सुशांतला ड्रग्जची सवय लावणाऱ्या आणि त्याला पूर्णपणे त्याच्या आहारी नेऊन ड्रग्ज पुरविणाऱ्या या आरोपींवर NCB ने लावलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या