JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Leg exercise करुन रितेश देशमुखचं झालं असं काही की आता चालणंही झालं मुश्किल!

Leg exercise करुन रितेश देशमुखचं झालं असं काही की आता चालणंही झालं मुश्किल!

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) या अभिनेत्याची अवस्था बघून हसू का रडू अशी चाहत्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. कोणी केली रितेशची अशी अवस्था?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जुलै: अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) या अभिनेत्याची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. सध्या हा अभिनेता त्याच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्याच सिनेमाचं शूटिंग संपल्याच्या आनंदात दिसून येत होता. मात्र जिमला जाऊन रितेशची अवस्था एकदम बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे. रितेशने यासंबंधी एक खास व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Ritesh Deshmukh instagram) शेअर केला आहे. रितेश सोशल मीडियावर तुफान ऍक्टिव्ह असतो. त्याने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये leg exercise करून त्याची हवा टाईट झाल्याचं त्याने शेअर केलं आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक नवा फिल्टर आला असून त्यात शूट केलेला कोणताही व्हिडिओ किंवा रील तुम्हाला वेडंवाकडं हलवून टाकतो. या फिल्टरची रचनाच अशी आहे नॉर्मल स्थितीत शूट केलेला व्हिडिओ सुद्धा विचित्र पद्धतीने हलू लागतो. याच फिल्टरमध्ये रितेश सुद्धा वेडावाकडा हलताना दिसत आहे. पायांचा व्यायाम जास्त केल्यावर चालताना त्रास होतो तसंच काहीसं या रीलमध्ये झाल्यासारखं वाटत आहे. हे दृश्य इतकं विनोदी दिसत आहे की चाहत्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. याआधी असा फिल्टर वापरून प्रार्थना बेहरेने सुद्धा विडिओ बनवला होता.या रीलला कॅप्शन देत तो लिहितो, ‘leg exercise चे साईड इफेक्ट’ त्याचे हे भन्नाट व्यायाम प्रकार बघताना सगळ्या चाहत्यांना हसू येत आहे. हे ही वाचा-  Girija oak: विनाकारण हॉर्न वाजवताय? मग गिरीजानं दिलेल्या भन्नाट उत्तरानं होईल तुमचा अपमान! “रितेश असे अनेक धमाल व्हिडिओ रिल्स कायम शेअर करत असतो. तो आणि त्याची बायको जेनेलिया हे अशाच अफलातून रील्स साठी ओळखले जातात. त्याच्या या नव्या रीलवर बऱ्याच कमेंट्स आल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या रितेश चर्चेत आहे ते त्याच्या नव्या सिनेमामुळे. रितेश दिग्दर्शनात पदार्पण करत असून ‘वेड’ या त्याच्या सिनेमाचं शूटिंग नुकतंच संपल्याचं त्याने एका खास पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसंच या पोस्टमध्ये त्याने त्याच्या लाडक्या सलमान भाऊचे म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे सुद्धा आभार मानले आहेत.

रितेश भाईजान सलमान खानला सलमान भाऊ असं संबोधतो. सलमानने त्याच्या या डिरेक्शन डेब्यू असणाऱ्या सिनेमात सुद्धा एंट्री घेतली आहे असं समजत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या