JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मुलांनी 'बाबा आई आली' ओरडताच रितेशला बसला धक्का; जेनेलियाच्या 'तोडफोड' ड्रायव्हिंगचा VIDEO केला शेअर

मुलांनी 'बाबा आई आली' ओरडताच रितेशला बसला धक्का; जेनेलियाच्या 'तोडफोड' ड्रायव्हिंगचा VIDEO केला शेअर

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia Deshmukh) नेहमीच सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जुलै: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia Deshmukh) नेहमीच सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. यावेळीही त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत जेनेलिया ड्रायव्हिंग (Genelia Dsouza) करत घरी येत आहे. पण इतक्यातच तिचा अपघात होतो. व ती एका गाडीला उडवते. दरम्यान खिडकीतून रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुलं पाहत असतात. व बाबा आई आली असं सांगतात. ते ऐकून रितेश ही धास्तावून जातो.

दरम्यान हा एक मजेशीर व्हिडिओ होता. व यातून रितेशने जेनेलियाच्या ड्रायव्हिंगची खिल्ली उडविली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे.  या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. अमृता खानविलकर, शरद केळकर, मयुरी देशमुख, सुनिल शेट्टी यांनी हसरे इमोजी लिहीत कमेंट्स केल्या आहेत.

सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच जान्हवीला टक्कर देतीये बहीण खुशी; फोटोंनी घातला धुमाकूळ

संबंधित बातम्या

यानंतर या व्हिडिओला तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर हास्याचा पाऊस पडत आहे. (Riteish – Genelia funny videos)

याआधीही त्यांनी अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले होते. जेनेलिया आणि रितेशची जोडी सोशल मीडियावर नेहमीच हीट ठरली आहे. बॉलिवूड मधील पॉवर कपल म्हणून ते ओळखले जातात. जेनेलिया चित्रपटांत दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

जाहिरात

याधीही दिग्दर्शक मिलाप झवेरीसोबत (Milap Zaveri) एक मजेशीर व्हिडीओ शेअर केले होते. अनेकदा ते त्यांच्या मुलांसोबतही व्हिडीओ शेअर करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या