मुंबई, 20 जुलै- मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या स्पष्ट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.ती नेहमीच प्रत्येक प्रश्नाचं आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर देत असते. प्रेक्षकांना तिच्या स्वभावाचं कौतुकदेखील वाटतं. दरम्यान आता अभिनेत्री आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. कारण या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने नागराज मंजुळे यांच्या डोक्यात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या?या प्रश्नाचं काय उत्तर दिलंय तुम्हीही वाचा. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू होय. रिंकू सध्या मराठी,हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.अभिनेत्री विविध धाटणीच्या चित्रपटातून आपली क्षमता सिद्ध करत आहे. नुकतंच अभिनेत्रीचा ‘आठवा रंग’प्रेमाचा हा चित्रपट रिलीज झाला होता.यामध्ये रिंकूने ऍसिड हल्ला झालेल्या एका मुलीची भूमिका साकारली होती.या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. दरम्यान चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी रिंकूने मराठी किडा या युट्युब चॅनेलला एक मुलाखत दिली होती.यादरम्यान अभिनेत्रीला एक कठीण प्रश्न विचारण्यात आला होता.तिला अभिनेत्रीने काय उत्तर दिलंय ते वाचा, या मुलाखतीमध्ये रिंकूला विचारण्यात आलं होतं की, नागराज मंजुळे यांच्या पाच अशा गोष्टी सांग ज्या तुझ्या डोक्यात जातात?यावर रिंकू खूप वेळ विचार करते आणि अशी एकही गोष्ट नसल्याचं सांगते. त्यांनंतर पुन्हा तिला फोर्स केल्यावर ती म्हणते, ते कोणाचंच ऐकून घेत नाहीत ते आपल्या मतावर ठाम असतात.ते म्हणतात तेच खरं असं असतं. त्यांनंतर विषय सांभाळत रिंकू बोलते, अण्णांना माहिती आहे मी हे फक्त तुमच्या या मुलाखतीसाठी बोलत आहे. माझ्या मनात असं काहीच नाहीय.
(हे वाचा: Kedar Shinde: केदार शिंदे शोधतोय ‘महाराष्ट्र शाहीर’; अंकुश चौधरीच्या नव्या सिनेमासाठी हवेत कलाकार, ऑडिशन्स सुरू ) वास्तविक ही एक गमतीदार मुलाखत होती.त्यामुळे अनेक मजेशीर प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात येत होते.रिंकूसुद्धा अगदी चोखपणे या प्रश्नांची उत्तरे देत होती.अभिनेत्रीचा हा आत्मविश्वास आणि बदललेला अंदाज प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. तसेच अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.या अलीकडच्या काही वर्षांत रिंकूमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वच थक्क होत आहेत.