मुंबई, 20 जुलै- मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे होय. केदार शिंदे यांनी अनेक कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्यांच्या करिअरमधील अशाच आणखी एका मोठ्या कलाकृतीची निर्मिती ते सध्या करत आहेत. केदार शिंदे सध्या आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यामध्ये अंकुश चौधरी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या इतर भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सुरु आहे. एक लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनामधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठविला आहे. सध्या ते आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात शाहीरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश दिसणार आहे. मात्र इतर भूमिकांसाठी सध्या शोध घेतला जात आहे. याची माहिती स्वतः केदार शिंदे यांनी आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. शिवाय शाहीर साबळेंना अंकुशच्या माध्यमातून पडद्यावर पाहण्यासाठी लोक आतुर आहेत.
(हे वाचा: Pallavi Patil: पल्लवी पाटीलची टीव्हीवर धमाकेदार एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका **)** केदार शिंदे यांनी सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.