मुंबई 11 जून: मराठीतील नामवंत अभिनेत्री (Rinku Rajguru) रिंकू राजगुरूने ‘सैराट’ (Sairat Marathi Movie) चित्रपटाच्या यशानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. रिंकूने सैराटमधून दमदार पदार्पण केलंच पण सोबतच एक अभिनेत्री म्हणून ती स्वतःला बरंच ग्रूम सुद्धा केलं आहे. स्वतःच्या अभिनयापासून फिटनेसपर्यंत सगळ्यावर लक्ष देत आज ती या स्थनावर पोहोचली आहे. पण माणूस म्हटलं की चांगल्या वाईट गोष्टींचा अंतर्भाव असतोच. रिंकूच्या अनेक चांगल्या गुणांमध्ये एक वाईट गुण सुद्धा आहे. तुम्हाला माहित आहे का याबद्दल? रिंकू जितकी बिनधास्त आणि गोड आहे तितकीच तिच्या खऱ्या आयुष्यात खूप समंजस पण आहे. अनेकदा वय कमी असल्याने तिला अनुभव कमी असेल अशी समजूत केली जाते पण रिंकू या सगळ्या समजुतींना खोटं पाडत स्वतःच वेगळं अस्तित्व सिद्ध करत आली आहे. रिंकूचा अत्यंत वेगळ्या विषयावरचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ (Aathava Rang Premacha) हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने ‘अल्ट्रा मराठी बझ ’ ला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टींवर खुलासा केला आहे. यात रॅपिड फायरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची तिने खरी आणि छान उत्तरं दिली आहेत. यात रिंकूला तिची वाईट सवय काय याबद्दल विचारलं तर तिने असं सांगितलं, ”माझी एक सवय आहे ज्याचा कधीतरी मला त्रास होतो. मी पटकन लोकांना जीव लावते आणि खूप जास्त जीव लावते. याचा मलाच बरेचदा त्रास होतो आता ती चांगली सवय आहे का वाईट याची कल्पना नाही पण मला कधीतरी त्रासदायक ठरतं.”
रिंकूला या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारले. तिच्याबद्दल लोकांना सगळ्यात जास्त प्रश्न हा पडतो की रिंकू कोणाला डेट करत आहे का? तिला नृत्याचं ज्ञान आहे आणि हे टॅलेंट अजून जगाला माहित नाही असंही ती म्हणाली. कामाबद्दल रिंकू खूप गांभीर्याने पावलं उचलते. तिला लग्नावरून सुद्धा अनेकदा विचारणा होते. तिला कसा मुलगा हवा आहे असं सुद्धा विचारलं जातं. हे ही वाचा- ‘कहो ना…प्यार है’ फेम 46 वर्षीय अभिनेत्री अमीषा पटेलने फ्लॉन्ट केली ‘फिगर’ मूळची अकलुजची असलेली रिंकू खूप कमी काळात प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. तिच्या आर्ची भूमिकेमुळे तिने न पुसता येणारी ओळख मिळवली असली तरी त्यापेक्षा वेगळ्या धाटणीच्या भूमिका सुद्धा ती उत्तम पद्धतीने करते. तिच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटातील भूमिकेबद्दल खूप उत्सुकता आहे.