मुंबई 16 जुलै: रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput) ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रियाचं नाव सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये वारंवार घेतलं जातं. सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या झालेल्या खळबळजनक मृत्यूसाठी अनेकांनी रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवल्याचं सुद्धा समोर आलं होतं. नुकतंच सुशांतच्या बहिणीने सुद्धा रियावर बरेच आरोप केले. त्यावर रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाल्याचं दिसून आलं आहे. सुशांतच्या बहिणीला दिलं उत्तर! रियावर सुशांतच्या बहिणीने गंभीर आरोप लावले होते. सुशांतचं आयुष्य तिच्या येण्याने खराब झालं असं प्रियांकाचं रियाबद्दल म्हणणं असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात आता रियाने सुद्धा एका इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. ती लिहिते, “गोंगाटातून वर या. आपल्या अहंकारातून बाहेर येऊन वर या. एवढी उंची गाठा की ते फक्त तुमच्याकडे बोट दाखवू शकतील. कारण तुम्ही ज्या उंचीवर आहात तिथे ते पोहचू शकत नाहीत. तुम्ही शांत आहात. तुम्ही प्रेमाने उंच भरारी घेत आहात. तुम्ही संयम आणि सहानुभूतीचा निभाव घेत आहात जेव्हा ते तसं राहायचं कारण देत नाहीत. त्यांना हैराण होऊ दे. तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही जसे आहात तसे उत्तम आहात. त्यांना तुम्हाला बोलायची संधी देऊ नका” अशा शब्दांमध्ये रियाने आपलं मत मांडलं आहे. हे मेसेज प्रियंकाला उद्देशून आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.
प्रियांका सिंग काय म्हणाल्या? सुशांतच्या बहिणीने म्हणजे प्रियांका सिंगने एका मुलाखतीत बोलताना रियाबद्दल बरीच व्यक्त होताना दिसली. “2019 मध्ये जेव्हा रिया सुशांतच्या आयुष्यात आली तेव्हापासूनच गोष्टी बिघडू लागल्या. आमच्यात सुद्धा अगदी कमी वेळात बऱ्याच गोष्टी बिनसल्या. रियाने माझ्या भावाचं आयुष्य उध्वस्त केलं” असं मत प्रियांका यांनी व्यक्त केलं. तसंच त्यांच्यामते सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असं सुद्धा त्या बोलताना दिसल्या. प्रियांकाच्या मते त्या जेव्हा रूममध्ये गेल्या तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की सुशांतने आत्महत्या केली नाही. प्रियांका स्वतः क्रिमिनल लॉयर म्हणून काम करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार सुशांतची उंची एवढी नव्हती की तो स्वतःला पंख्याला लटकावून घेण्यात यशस्वी होईल. तसंच सुशांतची रूम बदलल्याचा दावा सुद्धा त्यांनी मुलाखतीत केला आहे.
NCB ने फाईल चार्जशीट मध्ये रियाचं नाव असल्याची केल्याची बातमी सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक ड्रग्सचे कारनामे समोर आले होते. सुशांतशी निगडित ड्रग्स केसमध्ये NCB ने रियावर आरोप केला की सुशांतला ड्रग्सचा सप्लाय रिया करत होती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक संशयितांना कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती.