रिया चक्रवर्ती
मुंबई, 10 एप्रिल : अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं 2020 मध्ये आपलं जीवन संपवलं. त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीत रमतात. सुशांतच्या निधनानंतर एक नाव खूपच चर्चेत आलं ते म्हणजे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया आणि तिच्या भावाला तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर तिची सुटकसुद्धा झाली. या अभिनेत्रीचं करिअर संपलं असं वाटत असताना आता रियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तब्बल तीन वर्षांनी रिया पडद्यावर पुनरागमन करणार आहे. कुठे झळकणार आहे ती जाणून घ्या. अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच ‘एमटीव्ही रोडीज’ च्या नव्या सीझनमध्ये झळकणार आहे. ‘एमटीव्ही रोडीज’चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे आणि या शो मध्येच रिया देखील दिसणार आहे. तिच्यासोबत सोनू सूद देखील झळकणार आहे. या शोचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. नवीन प्रोमोमध्ये सोनू सूदने खुलासा केला आहे की आगामी सीझन मागील सीझनपेक्षा अधिक कठीण असणार आहे. सूत्रांनुसार, रिया चक्रवर्ती या सीझनची नवीन गँग लीडर देखील आहे. ‘एमटीव्ही रोडीज’ हा सर्वात जास्त काळ चालणारा आणि सर्वाधिक पाहिलेला रिअॅलिटी शो आहे. तरुणवर्गात या शोची प्रचंड क्रेझ आहे. रोडी बनण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. आता यात रिया चक्रवर्ती गँग लीडर म्हणून येणार आहे. Shefali Shah: भर बाजारात शेफाली शहासोबत घडलं धक्कादायक कृत्य; खुलासा करत म्हणाली ‘सांगायलाही लाज…’ रिया चक्रवर्तीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतीये, ‘तुम्हाला काय वाटलं मी वापस येणार नाही, मी घाबरले? पण आता घाबरण्याची वेळ दुसऱ्या कोणावर तरी येणार आहे. तयार राहा…’ रियाच्या एंट्रीचा MTV Roadies 19 ला किती फायदा होतो आणि किती तोटा होतो, हे शो सुरु झाल्यानंतरच कळेल. पण सध्या रियाच्या एन्ट्रीने शोबद्दलची आतुरता वाढली आहे हे नक्की.
सुशांतला ड्रग्जच्या आहारी ढकलल्याचा आरोपही अभिनेत्रीवर झाला होता. ज्या अंतर्गत रिया आणि तिच्या भावाला तुरुंगाच्या तुरुंगात जावे लागले. सुशांतचे प्रकरण बिहार पोलिस, मुंबई पोलिस, ईडी, सीबीआय, एनसीबीपर्यंत गेले, परंतु अभिनेत्याच्या मृत्यूला 3 वर्षे उलटली तरी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.
रियाच्या अभिनय कारकिर्दीविषयी बोलायचं तर ती शेवटची ‘चेहरे’ या चित्रपटात दिसली होती. आतापर्यंत ती मेरे डॅड की मारुती, जलेबी, हाफ गर्लफ्रेंड आणि बँक चोर या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. रोडीज या रिअॅलिटी शोचा भाग असणे रियाच्या करिअरसाठी किती फायदेशीर ठरते हे पाहावे लागेल. या शोच्या ऑडिशन राउंड आता सुरू आहेत. लवकरच हा शो टीव्हीवर प्रसारित होईल.