मुंबई 5 जुलै: बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. रेशमी अनेकवर्ष इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि आता ती अनेक वर्षांनी आपली छाप पुन्हा उमटवायला छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रेशम टिपणीस आता सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई ’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत रेशमी पाहायला मिळणार आहे. द्वारकाबाई होळकर असं तिच्या पात्राचं नाव असून अहिल्याबाईंच्या आयुष्यात काहीशी अडचण निर्माण करणारं हे पात्र असू शकत असा अंदाज सोनी टीव्हीने पोस्ट केलेल्या एका पोस्टरवरून लावता येतो आहे. सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हीजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्या’ ही मालिका अहिल्याबाई होळकरांचं आयुष्य उलगडून सांगणारी मालिका आहे. सध्या या मालिकेने आठ वर्षांची मोठी झेप घेतली असून मालिकेचा नवा अध्याय आजपासून उलगडणार आहे. (Aetashaa Sansgiri) एतशा संझगिरी, (Rajesh Shringarpure) राजेश शृंगारपुरे, गौरव अमलानी अशी पात्र या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता या नावांमध्ये रेशमचं सुद्धा नाव जोडलं जाणार आहे. लीपनंतर अहिल्याबाईंचा एक यशस्वी माता असण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या निमित्ताने रेशम पुन्हा टीव्हीवर झळकणार आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाल्याचं समजत आहे. तसंच एक खास नातं म्हणजे बिग बॉस मराठी मधील दोन कलाकार या मालिकेच्या निमित्ताने आमने सामने येणार आहेत. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे हे बिग बॉस मराठी मध्ये एकाच सीझनमध्ये पाहायला मिळाले होते. एका मोठ्या गॅपनंतर दोघेही एकाच मालिकेचा भाग असणार आहेत. हे ही वाचा- Girgaonchi Vaari: गिरगावची लेक रंगली वारीच्या रंगात! अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद रेशमने शेअर केलेल्या पोस्टवर सुद्धा बऱ्याच कमेंट आल्या असून त्यातून तिचं कौतुक ऐकायला मिळत आहेत.द्वारकाबाई होळकर हे पात्र काहीसं खलभूमिकेकडे झुकणारं आहे अशी माहिती समोर येत आहे. अहिल्याबाईंच्या आयुष्यात अडथळे निर्माण करणारं हे पात्र आहे असा अंदाज बांधला जात आहे. अहिल्याबाईंच्या आयुष्याची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनी त्यांच्या सासऱ्यांच्या मदतीने खूप मोठं साम्राज्य उभं करण्यात आणि ते यशस्वीपणे चालवण्यात लक्षणीय कामगिरी केली आहे. आता रेशम टिपणीस साकारत असलेलं पात्र नेमकं कसं असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.