JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी रेखाला सोडावा लागलेला मोठा चित्रपट; काय होता तो किस्सा?

अमिताभ यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी रेखाला सोडावा लागलेला मोठा चित्रपट; काय होता तो किस्सा?

अमिताभ बच्चन आणि रेखा त्यांच्या अफेअरशी निगडित किस्से लोक रंगवून सांगतात. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

अमिताभ बच्चन आणि रेखा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटापासून ते ‘सिलसिला’पर्यंत अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. या जोडीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ निर्माण करत असत. ही जोडी आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी आजच्या तरुण पिढीलाही या जोडीची लोकप्रियता चांगलीच माहिती आहे. ७० च्या दशकात रेखा-अमिताभ एकीकडे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असायचे. तर दुसरीकडे, त्यांच्या प्रेम आणि वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बातम्या देत असत. विवाहित असूनही रेखासोबत अमिताभ यांचे नाव जोडले गेले. आजही त्यांच्या अफेअरशी निगडित किस्से लोक रंगवून सांगतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जी बॉलिवूड अभिनेता रणजीतने सर्वाना सांगितली होती. ही कथा रंजितच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘कारनामा’ या चित्रपटाशी संबंधित आहे. ‘कारनामा’ हा असाच एक चित्रपट आहे, ज्यातून रणजीत अभिनेता आणि दिग्दर्शक झाला होता.  या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात विनोद खन्ना, फराह नाज, किमी काटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटात फराह नाजऐवजी रणजीतने रेखाला प्रथम कास्ट केले होते. पण वेळेची समस्या आणि अमिताभ बच्चन यांच्यामुळे रेखा चित्रपटातून बाहेर पडली.

रणजीतने एकदा rediff.com ला दिलेल्या मुलाखतीत रेखाला ‘कारनामा’ मध्ये कास्ट न करण्याबद्दल सांगितले होते. आपल्या संभाषणात रेखा आणि अमिताभच्या त्या किस्स्याच्या संदर्भ देत ते म्हणाले होते की, ‘सावन भादो’ चित्रपटाच्या पहिल्याच शॉटपासून मी आणि रेखा खूप चांगले मित्र झालो होतो. जेव्हा मी रेखाला ‘कारनामा’ चित्रपटासाठी ऑफर दिली तेव्हा ती चित्रपट करण्यास तयार होती. मात्र, नंतर जेव्हा चित्रपटाचे पहिले शेड्युल संध्याकाळी ठेवण्यात आले तेव्हा रेखाला अडचणींचा सामना करावा लागला. रणजीतच्या म्हणण्यानुसार, रेखाने त्याला कॉल केला आणि विचारले की मी सकाळी शूटिंग सुरू ठेवू शकते का, कारण तिला संध्याकाळ अमिताभ बच्चनसोबत घालवायची असायची. स्वतःच्या मुलाचा अभिनय पाहून सुपरस्टार वडिलांचं फिरलं डोकं; सगळ्यांसमोरच केलेलं असं काही याबद्दल बोलताना रणजीतने खुलासा केला की, यापूर्वी त्याने रेखाला याबाबत खूप समजावून सांगितले, पण तिने त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही त्यामुळे निर्मात्यांना दुसरा मार्ग शोधावा लागला. रणजीतच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने त्याचा जवळचा मित्र अभिनेता धर्मेंद्र याला त्याचे मत विचारले तेव्हा त्याने रेखाच्या जागी अनिता राजला चित्रपटात घेण्याचे सुचवले. रेखा सहमत नसेल तर बनवा. धर्मेंद्रने सांगितल्याप्रमाणे रणजीतने तसेच केले. पुढे, रणजीतने असेही सांगितले की जेव्हा त्याने रेखाचे ऐकले नाही, तेव्हा तिने चित्रपट तर सोडलाच पण त्यासाठी घेतलेली साइनिंग रक्कम देखील परत केली. अशा परिस्थितीत हा चित्रपट मध्येच थांबला आणि नंतर फराह, किमी आणि विनोद खन्ना यांना घेऊन हा चित्रपट बनवला गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या