मुंबई 21 जून: मराठीतील एक समर्थ अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या (Reema Lagoo) रीमा लागू यांची आज जन्मतिथी आहे. रीमा यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक समर्थ आणि जबाबदार भूमिका पेलत प्रेक्षकांना थक्क करून सोडलं होतं. कायमच एक कणखर आणि बंडखोर भूमिका त्यांची सगळ्यांना दिसली होती. असं जरी असलं तरी रीमा यांना बॉलिवूडमध्ये हव्या ताशा भूमिका मिळाल्या नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. रीमा (Reema) यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडं जाणून घेताना असं लक्षात येत की लहानपणापासूनच त्यांच्या घरात अभिनयचं वातावरण होतं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटातून काम केलं. अकरावीत मुंबईला आल्यावर त्यांना ‘ती फुलराणी’ नाटक मिळालं आणि त्यांचा अभिनयप्रवास पुन्हा सुरु झाला. रीमा यांचं पुरुष नाटकातील काम आजही विसरता येणं शक्य नाहीये. त्यांच्या सिंहासन, सविता दामोदर परांजपे, पुरुष अशा भूमिकांकडे पाहिलं तर त्याला एक अर्थ आहे हे जाणवत. कायमच काळाच्या पुढच्या स्त्रीची भूमिका त्यांनी साकारली होती. पण बॉलिवूडमध्ये त्यांना हव्या ताशा भूमिका मिळाल्या नाहीत अशी खंत त्या न्यूज 18 लोकमत ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त करतात. “मराठीत जितकं दर्जेदार आणि प्रचंड स्वरूपाचं काम मी केलं तश्या भूमिका मला बॉलिवूडमध्ये मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. आज मी नाटकांबद्दल जेवढं भरभरून बोलू शकते तास मी सिनेमाबद्दल बोलू शकत नाही. आपल्याकडे स्त्री भूमिकांबद्दल मेकर्ससुद्धा फारसे उत्साही नाहीयेत असं वाटतं. एवढ्या दोनशे-अडीचशे हिंदी चित्रपटातून मला कायम त्याच त्या आईच्या भूमिका मिळाल्या. अनेक भावनांचा गोंधळ होताना दिसतो. वेदना होतात, राग येतो कधी वाटत आपण एक प्रोफेशनल कलाकार आहोत त्यामुळे काम केलं पाहिजे कधी आपण काय करतोय याबद्दल चिडचिड सुद्धा होते.
पण आपलं काम आपण शांतपणेकराव आणि घरी यावं हे मी शिकले. हं आपके है कोणच्या रोलने मला प्रसिद्धी दिली. त्या भूमिकेचं सुद्धा वेगळं चॅलेंज होतं जे मी पार पाडलं पण त्यानंतर सुद्धा तीन-चार भूमिका वगळता प्रयोग करायला मला मिळाले नाहीत.” असं त्या सांगतात. रीमा यांना सलमानची आई, माधुरीची आई अशी एक ओळख बॉलिवूडमध्ये मिळाली. त्यांच्या या सोज्वळ आईचं बरंच कौतुक सुद्धा झालं पण त्यांच्या अभिनय सामर्थ्यापर्यंत पोहाचेल असे रोल त्यांना कमी मिळाले. हे ही वाचा- “तुझ्यासाठी तब्बल 2 वर्षे प्रतीक्षा केलीय’ करिना कपूरची पोस्ट नेमकी कुणासाठी?
जिथे रीमा पुरुष मधील बंडखोर अंबिका साकारतात, सविता दामोदर परांजपे नाटकात एक विलक्षण भूमिका करतात तिथे एकदम वेगळ्याच धाटणीची लाजणारी घरंदाज स्त्री, जबाबदार आणि प्रेमळ आई सुद्धा होतात हा त्यांच्या अभिनयाचा एक वाखाणण्यासारखा गुण आहे. रीमा यांनी 18 मे 2017 रोजी या जागचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने सगळी चित्रपटसृष्टी हादरून गेली आणि त्यांच्या चाहत्यांना अतीव दुःख झालं.