JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, स्वतःचं शेअर केला PHOTO

लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, स्वतःचं शेअर केला PHOTO

रिलेशनशिपच्या इतक्या वर्षांनंतरही दोघांचं नातं हे काल- परवा सुरू झाल्यासारखं वाटतं. दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ‘कपल गोल’ देत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर- रणवीर सिंग हे एक नाव घेतलं की त्याचा उत्साहच डोळ्यासमोर येतो. त्यातही रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रीन केमिस्ट्री साऱ्यांनीच पाहिली आहे. लवकरच दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही जवळ येऊ घातला आहे. दोघांनी जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रिलेशनशिपच्या इतक्या वर्षांनंतरही दोघांचं नातं हे काल- परवा सुरू झाल्यासारखं वाटतं. दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ‘कपल गोल’ देत असतात. नुकताच रणवीरने ‘गोलियों की रासलीला राम- लीला’ सिनेमाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला. रणवीर आणि दीपिकाने पहिल्यांदा या सिनेमात एकत्र काम केलं होतं. शेअर केलेल्या या फोटोत रणवीर दीपिकाला स्टॉक करताना दिसत आहे. चित्रीकरणातील ब्रेकमधील हा फोटो असून इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना रणवीरने लिहिले की, ‘या फोटोला कोणतंही कॅप्शन द्यायची गरज नाही.’

दोघांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच ‘83’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. 1983 मध्ये भारताने कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला होता. हीच कथा दिग्दर्शक कबीर खान या मांडताना दिसणार आहे. सिनेमात रणवीर क्रिकेटर आणि भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हजेच कपिल यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकरणार आहे.

लग्नानंतर दीपिका आणि रणवीरचा एकत्र असा हा पहिलाच सिनेमा आहे. रणवीर आणि दीपिका व्यतिरिक्त या सिनेमात हार्डी संधू, एमी विर्क, साकिब सलीम, आदिनाथ कोठारी, साहिल खट्टर यासारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर ‘83’ शिवाय दीपिका मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’मध्येही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या