**मुंबई, 23 जुलै :**बॉलिवूडमध्ये कोरोना काळानंतर अनेक सुपरस्टार्सचं भविष्य धोक्यात आलं. त्यात एक असाच सुपरस्टार आहे ज्याचं भविष्य एकाच चित्रपटावर अवलंबून आहे. संजय लीला भन्साळी आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी या अभिनेत्याला सुपरस्टार ही पदवी मिळवून दिली. मग कोरोनाचा काळ आला त्यानंतर सर्व काही नाहीसं झालं. महामारीनंतर, सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत या सुपरस्टारचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यासाठी निर्मात्यांनी 410 कोटी रुपये खर्च केले. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. तेव्हापासून हा सुपरस्टार एका सुपरहिट चित्रपटाची अपेक्षा करत आहे. महामारीच्या काळात बॉलिवूडसोबतच अनेक स्टार्सचे करिअर बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. त्यातले काही स्टार्स वाईट काळातून सावरले असले तरी एक सुपरस्टार अजूनही संघर्ष करत आहे. त्याचे शेवटचे ३ चित्रपट फ्लॉप ठरले. आता त्याचे भविष्य त्याच्या पुढील चित्रपटावर अवलंबून आहे. ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ सारखे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर रणवीर सिंग ‘गली बॉय’मध्ये दिसला होता. त्यामुळे त्याचे स्टारडम प्रचंड वाढले होते. पण त्यानंतर दीड वर्षात त्याचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, जे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले.
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा बॉलीवूडचे आणखी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळत होते, तेव्हा सगळ्यांच्या आशा रणवीर सिंगच्या ‘83’वर टिकून होत्या, ज्याची गणना बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांमध्ये केली जाते. चित्रपटाचे बजेट ‘बाहुबली’पेक्षा जास्त आहे. जेव्हा परिस्थिती सामान्य झाली तेव्हा निर्मात्यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी ‘83’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला. या चित्रपटात रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक केलं गेलं, पण 270 कोटींच्या बजेटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 109.2 कोटी कमवू शकला. जास्त कमाईची अपेक्षा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. नऊ वर्ष वाट पहिली पण शेवटी तुटलं नातं; ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी ऐकून ढसाढसा रडलेले राज कपूर रणवीर सिंग त्यानंतर ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात पुन्हा नव्या भूमिकेत दिसला. या चित्रपटाने मागच्या चित्रपटापेक्षा वाईट कामगिरी केली. 90 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 15.59 कोटींची कमाई करू शकला. इथे काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने गेलेला रणवीर सिंग पुन्हा पूर्णपणे फ्लॉप झाला. गेल्या वर्षी 23 डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंह पुन्हा दिसला. रोहित शेट्टीसोबत तो ‘सिम्बा’सारखा आणखी एक ब्लॉकबस्टर देईल अशी अपेक्षा होती, पण यावेळीही रणवीरचे नशीब त्याच्या विरोधात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सर्कस’ हा चित्रपट 150 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर फक्त 35.65 कोटी रुपयांची कमाई केली होती.
38 वर्षीय रणवीर सिंग आता आलिया भट्ट सोबत आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. करण जोहर दिग्दर्शित 200 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट या महिन्यात 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सगळ्यांनाच आता या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर हा सिनेमा हिट ठरणार का हे पाहणं महत्वाचं आहे.