JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer Singh : मोठ्या प्रोडक्शन कंपनीने सोडली रणवीर सिंगची साथ; अभिनेत्यासह चित्रपट करण्यास दिला नकार

Ranveer Singh : मोठ्या प्रोडक्शन कंपनीने सोडली रणवीर सिंगची साथ; अभिनेत्यासह चित्रपट करण्यास दिला नकार

रणवीर सिंगच्या तीन बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर, आता अशा बातम्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. काय घडलंय नक्की जाणून घ्या.

जाहिरात

रणवीर सिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 एप्रिल :  ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’ आणि ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ सारखे जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणवीर सिंगचा एकही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. कोरोना नंतर, 2021 मध्ये त्याचा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जयेशभाई जोरदार (2022) चित्रपटगृहात दाखल झाला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. जयेशभाई जोरदार या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली. त्याच वेळी, काहीदिवसांपूर्वी  प्रदर्शित झालेल्या सर्कसने बॉक्स. ऑफिसवर फक्त 35.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा मिळाली नाही. रणवीर सिंगच्या तीन बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर, आता अशा बातम्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सलग तीन फ्लॉपनंतर यशराज फिल्म्स म्हणजेच YRF ने काही काळ रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, ‘YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा आणि त्यांची मुख्य टीम सध्या YRF Spy Universe मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांनी अलीकडेच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा एक जबरदस्त ब्लॉकबस्टर दिला आणि सलमान खानचा ‘टायगर ३’च्या प्रदर्शनासाठी ते तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणताही सिनेमा फ्लॉप होण्याची रिस्क घ्यायची नाही. खासकरून शाहरुख खानच्या पठाणच्या यशानंतर आता YRF कोणतीही चूक करू इच्छित नाही.’ वायआरएफशी संबंधित एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, ‘प्रत्येक चित्रपटाचे बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही, असे बरेच काही धोक्यात आहे.’ अक्षय कुमारने घेतलेली राणी मुखर्जीसोबत कधीही काम न करण्याची शपथ; दोघांमध्ये आहे ‘साइलेंट दुश्मनी’ सूत्राने पुढे सांगितले की, ‘म्हणूनच, YRF ने रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्याने YRF सोबत केलेल्या सहा चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप ठरला नाही. अर्थात, ते नॉन-स्पाय युनिव्हर्स चित्रपट देखील बनवतील, परंतु रणवीरने YRF सोबत केलेल्या 6 चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप झाला आणि तो होता गुंडे (2014). हा चित्रपटही सेमी हिट ठरला होता. याशिवाय बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल (2011) आणि बेफिक्रे (2016) हे चांगले कमाई करणारे चित्रपट होते. दरम्यान, किल दिल (2014) आणि जयेशभाई प्रचंड फ्लॉप झाले. आता रणवीर सिंग यानंतर कोणत्या सिनेमात दिसणार याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात तो आलिया भट्ट सोबत रॉकी और राणी कि प्रेमकहाणी या सिनेमात झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या