मुंबई 11 जून: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सांवत (Rakhi Sawant) सध्या पॅपराझीची आवडती बनली आहे. सतत आपल्या मजेशीर फोटो आणि व्हिडिओजमुळे ती चर्चेत आहे. तर आता तिने वजन कमी करण्याचं ठरवलं असल्यानं ती तिच्या फिटनेस सेंटरबाहेर अनेकदा स्पॉट होते. आता तिने मुंबईच्या पावसाचा आनंद घेत भन्नाट डान्स केला आहे. ‘बिग बॉस 14’ (Big Boss 14) नंतर राखी सतत चर्चेत राहत आहे. तर शो मध्येही राखीने धम्माल केली होती. त्यानंतर आता ती सतत मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट होताना दिसते. कधी भाजी विकत घ्यायला तर कधी कॉफी प्यायला. आता तर ती वजन कमी करत आहे. त्याचेही भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता तिने मुंबईच्या पावसात डान्स करत आनंद लुटला आहे. ‘टिप टिप बरसा पाणी’ या आयकॉनिक गाण्यावर ती थिरकताना दिसली.
राखीचा हा भन्नाट डान्स नेटकऱ्यांसाठी चांगला मनोरंजक ठरला. काहींनी म्हटलं, ‘एन्टरटेन्मेंट क्वीन’ तर काहींना तिचा बिनधास्तपणाही आवडला. त्यामुळे सध्या राखी सोशल मीडियावर चांगलीच हीट ठरताना दिसत आहे. (Rakhi Sawant dance video)
विरल भयानी या साइटने राखीचा हा व्हिडिओ पोस्ट केला होता. काही तासातच त्याला चांगले व्हूजही मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी राखी मस्तानीचा वेश परिधान करत मुंबईच्या रस्त्यावर बाजीरावला शोधताना दिसली होती. तिचे तेही फोटोज फारच व्हायरल झाले होते.
‘कर्जात बुडाली होती नुसरत, मी मोठी रक्कम दिली’; निखिल जैनचा मोठा खुलासासोशल मीडियावर राखीची चांगली फॅनफॉलोइंगही आहे. तीचे 11 लाखांहून अधिक फॉलोवर्स इन्टाग्रामवर (Instagram followers) आहेत. तिच्या मजेशीर व्हिडिओजने ती नेहमीच चर्चेत राहते. इंडियन आयडॉलच्या (Indian Idol) एका भागातही ती दिसणार आहे.