मुंबई 04 ऑगस्ट: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोड्या गाजताना दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान. सध्या राखी आणि आदिल यांचं प्रेम सारखं उतू जाताना दिसत असतं. दोघेही एकमेकांसोबत नेहमीच दिसून येतात आणि मीडियासमोर सुद्धा प्रेम व्यक्त करायला ते कचरत नाहीत. या सगळ्या प्रेमाच्या माहोलमध्ये राखीने एक धक्कादायक खुलासा एका नव्या व्हिडिओमध्ये केला आहे. राखीचा बॉयफ्रेंड आदिल याला जीवे मारायची धमकी मिळत असल्याचं तिने म्हटलं आहे. आणि ही धमकी बिश्नोई गॅंगकडून दिली जात असल्याचा दावा तिने केला आहे. ड्रामा क्वीन म्हणून फेमस असणाऱ्या राखीने एका व्हिडिओमध्ये फोनवर आदिल खानला आलेली धमकी दाखवली असून तिचा दावा असा आहे की बिश्नोई गॅंगकडून त्याला ही धमकी देण्यात आली आहे. राखीने या व्हिडिओमध्ये बिश्नोई गॅंगला धमकी देत आदिलपासून दूर राहा असं म्हटलं आहे. हे ही वाचा- Kishore Kumar च्या जयंतीला आँख मारे गाण्यावर धिंगाणा; महिला अधिकाऱ्यांचा VIDEO व्हायरल तसंच यामध्ये ती म्हणते, “प्रेम करणं हा गुन्हा आहे का? आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही काय चुकीचं केलं आहे? आम्हाला धमकी का मिळत आहे? आदिलशिवाय मी जगू शकत नाही. त्याला मरण्याआधी तुम्ही मला संपवून टाका. पण मलाही का संपवाल तुम्ही? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं नाहीत का? कृपया याला गांभीर्याने घ्या. तुम्ही माझ्या भावासारखे आहात, बहिणीचा संसार मोडण्याऐवजी जोडून द्यायला मदत करा.”
कोणी दिली धमकी? दाऊद हसन नावाच्या एका कथित व्यक्तीकडून ही धमकी आली असून यामध्ये ‘राखीपासून दूर राहा, आम्ही तुला मारून टाकू, बिश्नोई गॅंगसे धमकी’ असं लिहिलं आहे. राखी तिला आलेला हा मेसेज व्हिडिओमध्ये दाखवताना दिसत आहे. याआधी सलमान खान यांचे वडील स्लिम खान यांना सुद्धा अशाच पत्राद्वारे जीवे मारायची धमकी मिळाली आहे.