JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील जादूचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन, जाणू घ्या त्याच्याबद्दल..

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील जादूचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन, जाणू घ्या त्याच्याबद्दल..

राजा राणीची गं जोडी (Raja ranichi ga jodi) मालिकेत नुकतीच जादू नावाच्या बालकलाकाराची एंट्री झाली आहे. जादूचं कोल्हापूरशी (Kolhapur connection) खास नातं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च- कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी (Raja ranichi ga jodi) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिका आहे. ही मालिक सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत नुकतीच जादू नावाच्या बालकलाकाराची एंट्री झाली आहे. मालिकेत जादूचा बिनधास्तपणा प्रेक्षकांना खूप भावला आहे. सर्वांना या जादूबद्दल (Ayush Ulagadde biography) जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. जादूचं कोल्हापूरशी  (Kolhapur connection) खास नातं आहे..याबद्दलचं आपण जाणून घेणार आहे. राजा राणीची गं जोडी (Raja ranichi ga jodi latest episode) मालिकेच जादूची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आयुष उलगड्डे (Ayush Ulagadde) असं आहे. आयुष हा मूळचा कोल्हापूरचा आहे. यापूर्वी त्याने दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत काम केले आहे. शिवाय संत गजानन शेगावीचे या सन मराठीवरील मालिकेत आयुष दिसला होता. वाचा- शशांक केतकरसोबत लग्न करण्यासाठी प्रियांकाने घातली होती ही अट आयुषने मालिकांशिवाय शॉर्टफिल्ममध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. भूक या शॉर्टफिल्ममध्ये आयुष मुख्य भूमिकेत झळकला होता. . यात आयुषणे निभावलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.  मालिका, शॉर्टफिल्मस यामध्ये त्याने आतापर्यंत अभिनय केला आहे. अभिनयासोबत तो एक चांगला डान्सर देखील आहे. त्याला डान्स करायला देखील खूप आवडते.

संबंधित बातम्या

दया भाईच्या तावडीतून सुटून आलेला हा जादू संजीवनी आणि रणजितचे मन जिंकून घेत आहे. दया जादूच्या शोधात असून तो दयाला पोलिसांच्या तावडीत पकडून देणार का हे येत्या काही भागात पाहायला मिळेल. मात्र कमी काळात या चिमुकल्याने निरागस अभिनयाच्या जोरावर सर्वांचे मन जिंकले आहे. मालिकेतील रणजीत आणि संजूची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडते. जादूच्या येण्यामुळे मालिकेत नवीन ट्वीस्ट आला आहे. त्याच्या अभिनयाचे  देखील कौतुक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या