जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन.. शशांक केतकरसोबत लग्न करण्यासाठी प्रियांकाने घातली होती ही अट

स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन.. शशांक केतकरसोबत लग्न करण्यासाठी प्रियांकाने घातली होती ही अट

स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन.. शशांक केतकरसोबत लग्न करण्यासाठी प्रियांकाने घातली होती ही अट

खरं खरं सांग..या चॅलेंजमध्ये अभिनेता शशांक केतकरत याने देखील प्रियांकाने (priyanka ketkar ) त्याला कोणत्या अटीवर लग्नाला होकार दिला हे खरं खरं सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च- टीव्ही जगतातील चॉकलेट बॉय शशांक केतकर  ( shashank ketkar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियावर सध्या दररोज नवीन ट्रेंड पाहायला मिळतात. सध्या मराठी मनोरंजन विश्वात खरं खरं सांग..हे चॅलेंज चांगलच चर्चेत आहे. या चॅलेंजमध्ये अभिनेता शशांक केतकरत याने देखील प्रियांकाने (priyanka ketkar ) त्याला कोणत्या अटीवर लग्नाला होकार दिला हे खरं खरं सांगितलं आहे. या एका गोष्टीमुळेच त्याचे प्रियांकासोबत लग्न झाल्याचे त्याने यामध्ये स्पष्ट केले आहे. अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिने शशांकला खरं खरं सांग हे चॅलेंज दिले आहे. हाच किस्सा शशांकने त्याच्या इन्स्टापेजवर व्हिडिओसह शेअर केला आहे. खरं खरं सांगणे इतकं कठीण असतं का अशी कॅप्शनही शशांकने दिली आहे. खरं खरं सांगतो असं म्हणतच शशांकने या व्हिडिओची सुरूवात केली आहे. शशांक या चॅलेंज ट्रेंडमध्ये असं म्हणताना दिसत आहे की, जेवण बनवण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. शूटिंग नसतं किंवा एक मालिका संपून दुसरे काम हातात नाही तेव्हा मला रिकामा वेळ असतो तेव्हाही मी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचाच उद्योग करत असतो. तो म्हणताना दिसत आहे की, जेव्हा सेटवर काही पदार्थ डब्यातून आणतो तेव्हा ते पदार्थ मीच बनवलेले असतात. तेव्हा अनेकांना ते खोटं वाटतं पण खरंच मीच माझा डबा बनवून आणतो. यापुढे जाऊन त्याने त्याच्या लग्नाचे एक सिक्रेट या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. वाचा- अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिली खास गिफ्ट..कारण देखील आहे तितकेच खास शशांक पुढे म्हणतो की, माझ्या बायकोला प्रियांकाला माझ्या पाककलेबद्दल सांगितले तेव्हा, ती म्हणाली होती की, मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा तू स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन. आणि शशांकनेही लगेच होकार दिला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रियांकाला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा ती दमून येते तेव्हा स्वयंपाकघराचा ताबा मीच घेतो. शशांकचे हे सिक्रेट मात्र चाहत्यांना खूप आवडलेले आहे.

जाहिरात

स्वयंपाकाच्या आवडीमुळे शशांकने आईच्या गावात हे हॉटेल सुरू केले. शिवाय त्याने त्याचे यूटय़ूब चॅनेल सुरू केले त्यातही तो वेगवेगळे पदार्थ बनवतानाच दिसला आहे.सध्या शशांक मुरांबा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात