JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Raj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत म्हटलं...

Raj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत म्हटलं...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रावर अश्लील चित्रफीत तयार करण्याचा आणि ते इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21सप्टेंबर- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा**(Raj Kundra)** गेली दोन महिने पोर्नोग्राफी प्रकरणामुळे जेरबंद होता. आज अखेर राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल २ महिन्यांनी राज कुंद्रा जेल बाहेर आला आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रावर अश्लील चित्रफीत तयार करण्याचा आणि ते इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी आपल्याकडे अनेक ठोस पुरावे असल्याचं सांगितलं होतं. तसेच या प्रकरणामध्ये अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी पुढे येत राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होत. मात्र आज २ महिन्यानंतर मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टाने ५० हजार रुपयांच्या रक्कमेवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आज राज कुंद्रा जमिनीवर बाहेर आला आहे. शिल्पाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत एका योगा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यामध्ये तिनें पॉजिटीव्ह थिंक शेअर केले आहेत. ( हे वाचा: Bigg Boss OTT: ‘दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार’; नेहा भसीनची मोठी ) उद्योजक राज कुंद्राने गेल्या शनिवारी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट ऑफिसमध्ये जामीनीसाठी अर्ज केला होता. आज हा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. राज कुंद्राने केलेल्या अर्जामध्ये त्याने म्हटलं होतं, ‘या सर्व प्रकरणात माझा नाहक बळी दिला जात आहे’. पोलीस पुराव्यांच्या आधारावर सध्या पुढील तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या