JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'इतक्या' कोटींना विकला गेला राज कपूर यांचा चेंबूर येथील आलिशान बंगला; किंमत ऐकून येईल भोवळ

'इतक्या' कोटींना विकला गेला राज कपूर यांचा चेंबूर येथील आलिशान बंगला; किंमत ऐकून येईल भोवळ

काही वर्षांपूर्वी त्यांचा आरके स्टुडिओ विकला गेला, जिथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले. आरके स्टुडिओनंतर आता त्यांचा चेंबूरचा कोट्यवधींचा बंगलाही विकला गेला आहे.

जाहिरात

राज कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी :  बॉलिवूडचा ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आणि निर्माता राज कपूर. त्यांनी अनेक वर्ष बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरले होते. अशा राज कपूर यांनी जाताना अनेक आठवणी मागे सोडल्या. ज्याची नेहमीच चर्चा झाली. राज कपूर यांचे फक्त  चित्रपटच नाही तर संपत्तीचीही वेळोवेळी चर्चा झाली आहे. त्यांचे मोठमोठे बंगले आणि आलिशान गाड्यांविषयी चाहत्यांच्या मनात नेहमीच कुतूहल होतं. पण आता त्यांच्या आठवणी मावळत चालल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा आरके स्टुडिओ विकला गेला, जिथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले. आरके स्टुडिओनंतर आता त्यांचा चेंबूरचा कोट्यवधींचा बंगलाही विकला गेला आहे. राज कपूर यांचा चेंबूर येथील बांगला गोदरेज ग्रुपने विकत घेतला आहे. आता या बंगल्याच्या जागी प्रीमियम निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज कपूर यांचा हा बंगला सुमारे 1 एकरमध्ये पसरला होता. हे मुंबईतील देवनार फार्म रोडवर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेजवळ आहे. हे क्षेत्र सर्वात प्रीमियम निवासी क्षेत्रांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. या कारणा मुळे, आता येथे एक प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. हेही वाचा - Samantha Ruth Prabhu: ‘पुष्पा 2’ मध्ये पुन्हा दिसणार समंथाच्या अदांचा जलवा? समोर आली मोठी अपडेट राज कपूर यांनी आपल्या मुलांसाठी सोडलेला सर्वात मोठा वारसा म्हणजे मुंबईच्या चेंबूर भागात आरके स्टुडिओ या नावाने प्रसिद्ध असलेली दोन एकरांची इमारत. श्री 420 ते ‘बॉबी’ सारखे अनेक संस्मरणीय बॉलिवूड चित्रपट या बंगल्यात शूट करण्यात आले आहेत. त्याची किंमत 500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या एवढ्या मोठ्या बंगल्याची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने कपूर कुटुंबाने 2018 मध्ये ही जमीन गोदरेज प्रॉपर्टीजला विकली.

आरके कॉटेज हे आरके स्टुडिओच्या मागे आहे. राज कपूर, त्यांची पत्नी कृष्णा राज कपूर आणि त्यांची मुले 1946 पासून सुमारे 3 हजार स्क्वेअर फुटांच्या या कॉटेजमध्ये राहत होते. ऋषी कपूर आणि नीतूपासून ते करिश्मा कपूर आणि संजयपर्यंत अनेक लग्न आणि रिसेप्शन पार्टी या कॉटेजमध्ये झाल्या. मात्र, राज कपूर यांच्या पत्नी आणि मुलीच्या इच्छेविरुद्ध 13 वर्षांपूर्वी ही मालमत्ता विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी त्याची अंदाजे किंमत 30 कोटी रुपये होती. बांधकाम व्यावसायिकांना त्याचे निवासी संकुलात रूपांतर करायचे होते.

आलिशान बंगल्यांसोबतच राज कपूर यांच्याकडे ब्रँडेड गाड्यांचा ताफा होता. त्या काळात कारने प्रवास करणे ही लक्झरी मानली जात होती आणि श्रीमंत कुटुंबातील असूनही राज कपूर यांनाही ते परवडत नव्हते. त्यानंतर काळ बदलला आणि राज कपूर यांनी एक सो एक गाड्या विकत घेतल्या. विशेषत: कपूर  त्यांनी स्वत:साठी अॅम्बेसेडर कार तर घेतलीच, पण अनेक मित्रांनाही भेट दिली. बॉक्स ऑफिसवर ‘बॉबी’च्या यशानंतर त्याने अनेक मित्रांना अॅम्बेसेडर म्हणून कार भेट दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या