मुंबई 22 जून: बॉलिवूडचं एक अनोखं कपल म्हणून (Smita Patil-Raj Babbar) स्मिता पाटील-राज बब्बर यांच्याकडे पाहिलं जातं. राज बब्बर (Raj Babbar) हे आपल्या वयाच्या सत्तरीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघताना त्यांच्याकडे एक यशस्वी अभिनेता म्हणून अनेक हिट सिनेमे आहेत तसेच एक राजकारणी म्हणून सुद्धा मोठं नाव आहे. त्याहूनही जास्त त्यांच्याकडे त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या अर्थात स्मिता पाटील यांच्या आठवणी आहेत. बॉलिवूडमध्ये ज्या अभिनेत्रीला अभिनयाचं एक विद्यापीठ समजलं गेलं, तिच्या अभिनयामुले जिला अनेक महान अभिनेत्रींच्या यादीत बसवलं गेलं, तिला अनेक पुरस्कारांनी नावाजण्यात आलं अशा स्मिता पाटील या मुलीच्या प्रेमात राज बब्बर (Who is Raj Babbar first wife) आधीच विवाहित असतानाही नेमके कसे पडले? स्मिता पाटील या पुण्याच्या मुलीने अभिनय क्षेत्र अगदी दणाणून सोडलं होतं. तिच्याकडे आजही इन्स्पिरेशन म्हणूनच पाहिलं जात. राज बब्बर आणि तिच्या संबंधांबद्दल आजही चर्चा होताना दिसते. (Raj Babbar & Smita Patil lovestory) काय आहे यांची लव्हस्टोरी? आज बब्बर आणि स्मिता पाटील यांची पहिली भेट ‘पलकें’ चित्रपटाच्या वेळी झाली. त्यांच्या या भेटीबद्दल टाईम्स ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीत त्यांनी बराचसा खुलासा केला होता. ते असं म्हणतात “स्मिता माझ्या आयुष्यात अचानक आली. तिला पहिल्यन्दा भेटून हे लक्षात आलं की ती खूप खोलवर विचार करणारी एक स्त्री आहे. ती कायमच खूप मैत्रीपूर्ण भावनेने वागायची आणि हळूहळू आमच्यातील जवळीक वाढली.”
स्मिताच्या प्रेमात पडण्याआधी त्यांचं लग्न नादिराशी झालं होतं. त्यावर ते सांगतात, “माझं स्मिताशी असलेलं नातं हे नादिरा आणि माझ्यातल्या समस्यांमुळे झालं असं अजिबात नाहीये, ते आपोआप नैसर्गिकरित्या झालं. नादिराने आमचं नातं खूप सामंजस्याने समजून घेतलं.” नादिरा यांना जेव्हा राज-स्मिताच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांना अतीव दुःख झालं. त्यांनी वारंवार हे सांगितलं आहे की त्यांच्या मुलांमुळे, जुही आणि आर्यनमुळे आणि थिएटरमुळे त्या यातून बाहेर येऊ शकल्या. सुरवातीच्या काळात राज आणि स्मिता यांच्या नात्यात बरेच तणाव होते. स्मिताला घर तोडणारी आणि संसार मोडणारी एक स्त्री अशा नजरेने पाहिलं जात होतं. राज आणि स्मिता यांना प्रतीक (Prateik Babbar) नावाचा मुलगा आहे जो सुद्धा अभिनय क्षेत्रात करिअर करत आहे. प्रतीकांच्या जन्माच्या वेळी डिलिव्हरी कॉम्प्लिकेशनमुळे स्मिताचा मृत्यू झाला. आणि फिल्म इंडस्ट्रीने एक महान नटी अवघ्या एकतिसाव्या वर्षी गमावली. हे ही वाचा- फिल्म साईन करण्याआधी तुमचे लाडके Bollywood कलाकार करतात ‘या’ DEMANDS राज यांना स्मिताच्या निधनांनंतर जबर धक्का बसला होता त्यांना या सदम्यातून बाहेर यायला वेळ लागला. त्यांनी पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीकडे जायचा निर्णय घेतला. त्यांच्या पहिल्या पत्नीनेसुद्धा त्यांना पुन्हा स्वीकारलं. एवढंच नाही तर प्रतीकच प्लांप्शन करण्यात तिने मोठा सहभाग घेतला असं सांगितलं जातं.