अल्लू अर्जुन
मुंबई, 14 एप्रिल : ‘पुष्पा’ म्हणजेच सगळ्यांचा लाडका अभिनेता अल्लू अर्जुन कायमच चर्चेत राहतो. नुकताच त्याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून तो सगळ्यांकडून वाहवा मिळवत आहे. अल्लू अर्जुन भारतातील बड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एकीकडे तो चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने जोरदार कामगिरी करत असताना दुसरीकडे त्याच्या चिमुकल्या लेकीनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात अल्लू अर्जुनची मुलगी आरहा झळकत आहे. स्वतः अभिनेत्याने याविषयी माहिती दिली आहे. अल्लू अर्जनच्या मुलीने अल्लू अर्हाने बहुचर्चित ‘शाकुंतलम’ या चित्रपटातून अभिनयविश्वात पदार्पण केलं आहे. त्याची मुलगी अवघ्या सहा वर्षांची आहे. समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट 14 एप्रिलला बैसाखीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मधू शाह आणि सचिन खेडेकर देखील दिसत आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पण यात सर्वात जास्त चर्चेत अल्लू अर्जुनची मुलगी आहे.
गुणशेखर दिग्दर्शित पॅन इंडिया चित्रपट ‘शाकुंतलम’ च्या रिलीजच्या दिवशी, पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनने ट्विट करून चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले. आपल्या मुलीचा अभिनय लोकांना आवडला असेल अशी मला आशा आहे असेही तो म्हणाला आहे. अल्लू अर्जुनने या ट्विटमध्ये म्हटलंय कि, ‘शाकुंतलमच्या रिलीजसाठी सर्वांचे खूप खूप अभिनंदन. गुणशेखर गर, नीलिमा गुणा आणि SVC तसेच माझी लाडकी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि माझा मल्लू भाऊ देव मोहन यांचे खूप खूप अभिनंदन.’ Kgf chapter 3: रॉकी पुन्हा परतणार? अखेर KGF 3 बद्दल मोठी बातमी समोर अल्लू अर्जुनने पुढे लिहिले, ‘मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माझी मुलगी अल्लू अर्हाचा कॅमिओ देखील आवडला असेल. तिला ही संधी देण्याबद्दल आणि तिची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल गुणशेखरचे खूप खूप आभार. हा क्षण आम्ही नेहमी जपून ठेऊ.’ अल्लू अर्जुनच्या लेकीचा अर्हाचा अभिनयही चाहत्यांना आवडला आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘पिंकविला’ सोबतच्या खास संवादात सामंथा रुथ प्रभूने अल्लू अर्हाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, ‘ती खूप गोड आहे. तो तुमच्या मनावर लगेचच कब्जा करते. पूर्वी तिला इंग्रजीतून एक शब्दही बोलता येत नव्हता. ती फक्त तेलुगु बोलत होती आणि या भाषेत ती वडिलांपेक्षाही चांगली बोलते. ती खूप हुशार आहे. मला पहिला दिवस आठवतो जेव्हा मी ट्विट केले होते की ती सुपरस्टार आहे आणि तिला नाव कमावण्यासाठी तिच्या वडिलांची गरज नाही. कारण ती जन्मजात सुपरस्टार आहे.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या. आता अल्लू अर्जुनाची लेक सामंथा सोबतच झळकत आहे.