प्रियांका चोप्रा
मुंबई, 24 मे : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा . सध्या ती तिच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही हॉलिवूडची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. तसेच सध्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये ती अशी विधाने करते की सर्वत्र त्यांची चर्चा होऊ लागते. प्रियांका चोप्रा अनेक दिवसांपासून बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठे खुलासे करत आहे. याआधी प्रियांका चोप्राने इंडस्ट्रीमधील नेपोटीझम बद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने सांगितले होते की, तिला इंडस्ट्रीतील लोकांनी कसे एकटे पाडले होते. आता एका मुलाखतीदरम्यान, प्रियांका चोप्राने बॉलीवूडमधील तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही घटना 2002 ते 2003 दरम्यान घडली. ती इंडस्ट्रीत नवीन होती आणि तिला अंडरकव्हर एजंटची भूमिका करावी लागली. या भूमिकेसाठी प्रियंका एका दिग्दर्शकासोबत काम करत होती ज्याला ती आजपर्यंत कधीही भेटली नव्हती. या चित्रपटातील एका दृश्यादरम्यान प्रियांका चोप्राला एका मुलाला फूस लावावी लागली होती. यासाठी अभिनेत्रीला तिच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगण्यात आले.
या सीनसाठी प्रियांका चोप्राला अंगावर काही कपडे असावेत अशी इच्छा होती. पण त्या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणाला नाही, ‘मला तिची अंतर्वस्त्रे पाहायची आहेत, नाहीतर हा चित्रपट पाहायला कोणी का येईल?’ VIDEO: फातिमा सना शेख सोबतचा आमिर खानचा ‘तो’ VIDEO पाहून नेटकरी एकच म्हणतायतं, ‘आता लग्न कधी…’ प्रियांका चोप्रा या मुलाखतीत पुढे म्हणाली की, ‘दिग्दर्शकाने मला हे थेट सांगितले नाही तर माझ्या स्टायलिस्टला माझ्यासमोर सांगितले.’ प्रियांका म्हणाली की हे अगदी विकृत होते. आपली कला महत्त्वाची नाही, आपण काय योगदान दिले ते महत्त्वाचे नाही, असे तिला वाटू लागले होते. दोन दिवस काम केल्यानंतर अखेर प्रियांकाने हा चित्रपट सोडला आणि स्वतःच्या खिशातून पैसे देऊन प्रॉडक्शन हाऊसमधून काढता पाय घेतला. दिग्दर्शकाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘मला त्यांचा चेहरा रोज पाहायचा नव्हता म्हणून मी तो चित्रपट सोडला.’ प्रियांकाच्या या धक्कादायक खुलाश्याची आता चर्चा होत आहे. प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, प्रियांका नुकतीच अॅमेझॉनच्या वेब सीरिज ‘सिटाडेल’ आणि रोमँटिक ड्रामा फिल्म ‘लव्ह अगेन’मध्ये दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. प्रियांकाला पुन्हा बॉलिवूडच्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.