JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra birthday: बॉलिवूडच्या यंग अभिनेत्रींपेक्षा जास्त कमावते प्रियांका, PC चं नेटवर्थ किती आहे?

Priyanka Chopra birthday: बॉलिवूडच्या यंग अभिनेत्रींपेक्षा जास्त कमावते प्रियांका, PC चं नेटवर्थ किती आहे?

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री प्रियांका चोप्रा चाळीशीत पाद्रपण करत आहे. वयाच्या एवढ्या टप्प्यावर येऊनही तिची कमाई नेमकी किती आहे माहित आहे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 जुलै:  बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा उद्या म्हणजे 18 जुलैला चाळीशीत पदार्पण करणार आहे. चाळीशीच्या घरात पोहोचलेली ही अभिनेत्री आजही चिकार पैसे कमावते. नुकतीच आई झालेल्या PC ची नेट वर्थ किती आहे माहित आहे का? प्रियांका ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिची निक जोनसशी जमलेली जोडी आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. प्रियांका वयाच्या चाळीशीत सुद्धा चाहत्यांना आपल्या फिटनेस आणि अभिनयासाठी आजही तितकीच नावाजली जाते. आजच्या काळातल्या अभिनेत्रींना तोडीस तोड या अभिनेत्रीची (Priyanka Chopra net worth) संपत्ती आहे अशी माहिती समोर येत आहे. प्रियांका चोप्राची नेट वर्थ ही दोनशे कोटींपेक्षा जास्त आहे अशी माहिती समोर येत आहे. बॉलिवूडच्या PC ची नेटवर्थ 270 कोटींच्या घरात आहे असं सांगितलं जातं. तसंच ही अभिनेत्री महिन्याला 1.5 कोटींहून जास्त पैसे कमावते अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. या अभिनेत्रीची सॅलरी जवळपास अठरा कोटींच्या घरात आहे असं सुद्धा सांगितलं जातं.

बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसारखी प्रियांका सुद्धा प्रत्येक प्रोजेक्टचे बरेच पैसे घेते असं सांगितलं जातं. प्रियांका तिच्या वर्क फ्रंटवर बरीच सक्रिय आहे. सध्या ती तिचं आईपण एन्जॉय करताना दिसत आहे. हे ही वाचा-  Tanmay Bhat: ललित-सुष्मिताच्या Viral फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला निराळा ट्विस्ट

प्रियांका आणि निक यांनी सरोगसीचा माध्यमातून एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवण्यात आलं. सध्या आपल्या सहा महिन्याच्या लेकीसह प्रियांका ट्रीपला गेल्याचं सुद्धा दिसून आलं आहे. प्रियांका कायमच सोशल मीडियावर तिचे आणि निकचे बरेच अपडेट शेअर करत असते. दोघांचंही क्युट प्रेम आणि गोड moments बघायला चाहते नेहमीच उत्सुक असतात.

प्रियांका झोया अख्तरच्या ‘जी ले जरा’ सिनेमात दिसून येणार आहे. दिल चाहता है मध्ये तीन मित्रांची टोळी दिसून आली होती तशीच तीन मैत्रिणींची जोडी यामध्ये दिसून येणार आहे. तिने हा प्रोजेक्ट सोडल्याच्या चर्चा सुद्धा काही काळापूर्वी समोर आल्या होत्या. यामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट या अभिनेत्रीसुद्धा दिसणार आहेत. प्रियांकाने आपल्या मैत्रिणीला कतरिनाला तिच्या वाढदिवशी विश करून आपलं प्रेम सुद्धा व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या