JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priya Bapat: प्रिया बापटला आली तिच्या या भूमिकेची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Priya Bapat: प्रिया बापटला आली तिच्या या भूमिकेची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाली...

प्रियाच्या (Priya Bapat Instagram) नव्या पोस्टवरून ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेबसीरिजच्या नव्या सिजनचे संकेत दिले आहेत का? प्रियाला नेमकी कोणाची आठवण येत आहे तुम्हाला माहित आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 जून: प्रिया बापट (Priya Bapat) या अभिनेत्रींच्या रूपात मराठी इंडस्ट्रीला एक उत्साहाने भरलेली गोड आणि अप्रतिम नटी मिळाली आहे. बालनाट्य त्यांनतर मालिकांपासून सुरुवात करत आज प्रिया मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची आणि आघाडीची अभिनेत्री बनली आहे. प्रिया सध्या कोणालातरी जबरदस्त miss करत आहे. आणि या व्यक्तीचं मोठं राजकीय नातं आहे. प्रियाने अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. तिने मागच्या काळात एका कमाल वेबसीरिजच्या माध्यमातून एक सुंदर भूमिका साकारली होती आणि ती त्या भूमिकेची आठवण काढत असल्याचं समोर येत आहे. प्रिया सोशल मीडियावर (Priya Bapat Instagram) खूप ऍक्टिव्ह असते. तिच्या फिटनेस विडिओ पासून अनेक गोष्टी ती शेअर करत असते. तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City Of Dreams webseries) नावाच्या एका राजकीय गुंतागुंतीच्या वेबसिरिजमध्ये पौर्णिमा गायकवाड हे पात्र साकारलं होतं. सत्तापालटावर आधारित या वेबसिरीजमध्ये तिने एका अशा स्त्रीची भूमिका साकारली होती जिच्याकडे खूप टॅलेंट असूनही तिला सत्तेच्या खेळात डावललं जात होतं. तिचा सत्तेच्या दृष्टीने दाखवलेला संघर्ष आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी अतिशय रोमहर्षक पद्धतीने दाखवली होती. या तिच्या भूमिकेला बरीच पसंती मिळाली होती तसंच या वेबसिरीजचा दुसरा भाग सुद्धा नुकताच येऊन गेला ज्याला प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद मिळाला. प्रियाने तिच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या भूमिकेचे bts फोटो शेअर केले आहेत. ती या पात्राला खूप मिस करत आहे असं तिने या पोस्टमध्ये म्हणलं आहे. ‘Oh..! I miss her 😌😌 Poornima Gaikwad ❤️ Do you miss her too ??’ अशी कॅप्शन देत एक खास पोस्ट शेअर केली.

संबंधित बातम्या

यात अनेक चाहत्यांनी तिच्या या पात्राची पुन्हा आठवण काढली आणि ते सुद्धा या भूमिकेला मिस करतात असं त्यांनी आवर्जून सांगितलं. या पोस्टवरून सिटी ऑफ ड्रीम्सचा (Is City Of Dreams season 3 coming) तिसरा सीजन येणार आहे का अशी शंका अनेकांच्या मनात येत होती. त्याबद्दल तिला विचारल्यावर तिने ‘मला सुद्धा आवडलं असत पण तसं आत्तातरी होणार नाही,’ असं म्हणत ही शक्यता फेटाळली आहे . हे ही वाचा-  Prajakta Mali: ‘माझ्याकडे प्रोजेक्ट आला की तो हिटचं असतो’, प्राजक्ता माळीच म्हणणं नेमकं काय? सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी सीजन तीन नक्की येणार असे संकेत दिले आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. दुसरा सीजन ज्या पद्धतीने ज्या वळणावर संपला त्यामुळे नक्कीच या राजकीय सस्पेन्स कथेचा तिसरा अंक यावा अशी सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे. तसं झालं तर प्रियाच्या या भूमिकेचं काय होईल हे पाहायला गंमत येईल हे मात्र खरं. अजून याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसली तरी चाहते अशा बाळगून आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या