मुंबई, 20 मे: टीम इंडियाचा (Team India) युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Cricketer Prithvi Shaw) अभिनेत्री प्राची सिंह (Actress Prachi Singh) यांंचं अफेअर असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस होत आहेत. प्राचीने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडीओत प्राची फिल्म ‘धन धना धन गोल’ चित्रपटातील ‘बिल्लो रानी’ (billo rani) या गाण्यावर बेली डान्स (Belly dance) करताना दिसत आहे. या गाण्यातील तिच्या अदा चाहत्यांना भुरळ घालत आहेत. या व्हिडीओला तिने’बॉली-मूड’असं कॅप्शन दिलंय. यात तिचं नृत्य बघूनचाहते कौतुक करताना थकत नाही आहेत. अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 30 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर देखील प्राची खूप सक्री. असून नेहमी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत ती पोस्ट करत असते.
क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंहच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. हे दोघंही आतापर्यंत एकत्र दिसले नाहीत, मात्र, सोशल मीडियावर प्राची पृथ्वीचे फोटो टाकत असते. 2020च्या आयपीएल स्पर्धेपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत. दोघंही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोवर कमेंट्स करत असतात. या वर्षीच्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेदरम्यान जेव्हा जेव्हा पृथ्वी शॉ चांगलं खेळत होता, तेव्हा प्राची त्याचं कौतुक करणाऱ्या आणि त्याला चिअर करणाऱ्या पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत होती. हे वाचा- क्रिकेट फॅन्सच्या मागणीनंतर डेव्हिड वॉर्नर परतला, शेअर केला भन्नाट VIDEO दिल्ली कॅपिटल्समधील महत्त्वाच्या खेळाडू असणाऱ्या पृथ्वीने त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये 72 रन्स काढले होते, तेव्हा प्राचीने पृथ्वीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला टाकून ‘द शॉ काय सुरुवात केली आहेस’ असं कॅप्शन दिलं होतं. प्राचीच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्या दोघांचं अफेअर असल्याचं बोललं जातं. मात्र, त्यांनी नात्याबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. प्राची सिंह टीव्ही अभिनेत्री असून तिने उडान मालिकेत वंशिका ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच प्राचीने सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर गाण्यावर बेलीडान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हे वाचा- मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच यावर्षीच्या आयपीएलच्या सीझनमध्ये पृथ्वी चांगला खेळला होता. दरम्यान कोरोनामुळे बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्पर्धा स्थगित केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. पृथ्वीने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू (International cricket debut) केला होतं. त्यानंतरच्या बऱ्याच मॅचमध्ये पृथ्वी चांगलं खेळला आहे.