JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

दोन महिन्यांपूर्वीच रुपेशचं लग्न झालं होतं आणि लवकरच रुपेशची पत्नी कॅनेडाला त्याच्यासोबत राहायला जाणार होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै- टीव्ही शोबिग बॉसच्या ९ व्या सिझनचा विजेता प्रिन्स नरुलाच्या भावाचा रुपेश नरुलाचा काही दिवसांपूर्वी कॅनेडा येथील एका बीचवर बुडून मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर प्रिन्स फार दुःखात आहे. या प्रसंगानंतर प्रिन्सने एका वेबसाइटला भावाचा मृत्यू कसा झाला याबद्दल माहिती दिली. या मुलाखती दरम्यान, प्रिन्स हुंदके देत रडत होता. रुपेश टोरेंटोमध्येच राहत असल्याचं तो म्हणाला. 1 जुलैला आपल्या मित्र- परिवारासोबत तो बीचवर फिरायला गेला होता. थोड्यावेळाने त्याचं कुटूंब घरी परतलं पण रुपेश मित्रांसोबत तिथेच थांबला. मुलाखतीदरम्यान प्रिन्स अनेकदा भावुक होऊन रडलाही. स्वतःवर संयम राखत तो पुढे म्हणाला की, रुपेश तिथे कॅनडा डे साजरा करण्यासाठी गेला होता. रुपेशला पोहता येत नव्हतं त्यामुळेच तो समुद्रात बुडाला. पिन्स म्हणाला की, रुपेशचा मित्र पार्किंगमधून कार काढण्यासाठी गेला होता तेव्हा त्याला लोकांचा आरडा ओरडा ऐकू आला. अनेकजण ‘बुडाला.. बुडाला..’ असं म्हणत होते.

प्रिन्सने सांगितल्यानुसार, रुपेशला सुमारे 20 मिनिटं शोधण्यात आलं पण तो तिथे सापडला नाही. रुपेशच्या मित्रांनाही कळलं नाही की नेमकी हा अपघात कसा झाला. दोन महिन्यांपूर्वीच रुपेशचं लग्न झालं होतं आणि लवकरच रुपेशची पत्नी कॅनेडाला त्याच्यासोबत राहायला जाणार होती. टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल जर मला तिकीट मिळालं नाही तर तुलाही देणार नाही, दोघीही नॉमिनेट होऊ- वीणा जगताप World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या