JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Timepss 3: दगडू, ठाणे आणि 'ती' चाळ; प्रथमेश परबनं सांगितल्या भावूक आठवणी, म्हणाला...

Timepss 3: दगडू, ठाणे आणि 'ती' चाळ; प्रथमेश परबनं सांगितल्या भावूक आठवणी, म्हणाला...

प्राजूचा दगडू ते पालवीचा दगडू यामध्ये जरी बदल टाइमपास 3 या सिनेमात झाला असला तरी एक गोष्ट मात्र जशीच्यातशी आहे. ठाण्यातील त्या चाळीविषयी प्रथमेशनं आठवणी सांगितल्या.

जाहिरात

प्रथमेश परब टाइमपास 3

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 नोव्हेंबर : ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिल से हम अमीर है अमीर’, अशा एकाहून एक पैसा वसूल डायलॉगमुळे प्राजूचा दगडू लोकप्रिय झाला. टाइमपास, मग टाइमपास 2 आणि आता टाइमपास 3 मधून प्रेक्षकांना थिएटरमध्ये पोट दुखेपर्यंत हसवल्यानंतर टाइमपास 3 हा सिनेमा आता प्रेक्षकांना घरी बसून पाहता येणार आहे.  प्राजूचा दगडू ते पालवीचा दगडू यामध्ये जरी बदल टाइमपास 3 या सिनेमात झाला असला तरी एक गोष्ट मात्र जशीच्यातशी आहे. दगडूच्या भूमिकेत जान ओतणाऱ्या अभिनेता प्रथमेश परब ने टाइमपासच्या पहिल्या भागातील ज्या जागेशी त्याचं नातं जुळलं ती चाळ आजही तशीच आहे, म्हणत आठ वर्षापूर्वीच्या आठवणी सांगितल्या. या सिनेमाच्या झी टॉकीज प्रीमियरच्या निमित्ताने प्रथमेश परब याने काही किस्से शेअर केले आहेत. टाइमपास सिनेमाच्या तिन्ही भागांमधील दगडू राहत असलेल्या ज्या चाळीत शूटिंग झाले ती चाळ आजही आहे तशीच आहे. प्रथमेश या चाळीतल्या कानाकोपऱ्याशी किती जोडला गेला आहे ते दिसून आलं. ठाण्यातील या चाळीशीही असलेल्या आठवणी जागवत प्रथमेश म्हणाला,  टाइमपास ३ चं शूटिंग सुरू झालं तेव्हा करोनाची पहिली लाट ओसरली असली तरी दुसऱ्या लाटेचं सावट होतं. काही अटींवर शूटिंगला परवानगी मिळाली होती. ठाण्यातील त्याच चाळीत आम्ही शूटिंग करत होतो. हेही वाचा - Prathamesh Parab: दगडू दादूसला मिळाली रिअल लाईफ प्राजक्ता? प्रथमेशच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा प्रथमेश पुढे म्हणाला,  ‘जिथे टाइमपासचा पहिला भागही चित्रित झाला होता. तिथेच तिसऱ्या भागात शुटींग सुरू झालं.  त्यावेळी लहान असलेली मुलं आता थोडी मोठी झाली होती. चाळीतले काका काकू, दादा, आजीआजोबा यांनी पहिल्याच दिवशी मला गराडा घातला. करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेलं सुरक्षित अंतर कधी गळून पडलं कळलंही नाही. मला बघून मुलांनी टाइमपास सिनेमातील डायलॉग बोलायला सुरूवात केली. आठ वर्षानंतर दगडूला जणू त्याची फॅमिलीच भेटली असं मला वाटलं’. ‘चाळीतलं एकही घर बदललं नव्हतं, दारं, खिडक्या, बाथरूमच्या बाहेरच्या दिशेने असलेल्या पाइप सगळं जसंच्या तसं होतं. त्यामुळे टाइमपास ३ या सिनेमात दगडूची खोली दाखवण्यासाठी आम्हाला काहीच बदल करावे लागले नाहीत. चाळीत शूटिंग करताना असं कधीच वाटलं नाही की मधल्या काळात  आठ वर्षे निघून गेली आहेत. टाइमपास हा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे आणि त्यातही ठाण्यातील ती चाळ म्हणजे माझ्याशी कायम जोडलेल्या दगडूचं घर आहे, असंही प्रथमेश म्हणाला.

टाइमपास ३ हा सिनेमा रविवारी 20 नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकिजवर पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या