कसं जुळलं मानसी-प्रदीपचं सुत

अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती बॉक्सर प्रदीप खरेरा कायम चर्चेत असतात. 

सध्या मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा घटस्फोट घेणार अशा चर्चा आहेत. 

मानसी नाईक प्रदीप खरेराची लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया. 

मानसीने 2020 मध्ये तिच्या आणि प्रदीपच्या नात्याविषयी सांगितलं. 

वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2021मध्ये लग्नगाठ बांधली. 

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. 

लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा संसार मोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. 

मानसीने सोशल मीडियावरुन नवऱ्यासोबतचे सगळे फोटो आणि आडनावही हटवलं आहे. 

मानसी-प्रदीपचे चाहते ते वेगळे होणार असल्यामुळे चिंतेत आहेत.